गौतम अदानींना धक्का! संपत्तीत मोठी घट; अब्जाधीश उद्योजकांच्या यादीत घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 11:50 AM2021-06-30T11:50:45+5:302021-06-30T11:55:58+5:30

gautam adani: अदानी समूहाच्या गौतम अदानींना मोठा धक्के पे धक्का बसत आहे.

रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना मागे टाकण्याच्या तयारीत असलेल्या अदानी समूहाच्या गौतम अदानींना मोठा धक्के पे धक्का बसत आहे.

एका वृत्तामुळे आठवडाभरात अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात कोसळले. याचा कंपनीसह गौतम अदानी यांनाही मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.

गौतम अदानी यांच्या मालमत्तेत १.५५ अब्ज डॉलर्सची घट झाली असून ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये अदानी यांची १७ व्या स्थानी घसरण झाली आहे. गौतम अदानी यांनी करोना संकटकाळात देखील अदानी समूहाची घोडदौड कायम ठेवली होती.

अदानी यांची एकूण संपत्ती ७७ अब्ज डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर गेली होती. त्यांच्या नेटवर्थमध्ये चालू वर्षात २८.४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती.

भांडवली बाजारात अदानी समूहातील शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली. तीन शेअरला मोठा फटका बसला. यामुळे अदानी समूहाचे बाजार भांडवल कमी झाले. यामुळे अदानींच्या अब्जाधीश उद्योजकांच्या यादीत मोठी घसरण झाली आहे.

अदानींच्या एकूण संपत्ती ६२.२ अब्ज डॉलर्स इतकी खाली आली आहे. Bloomberg Billionaires Index मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी १२ व्य स्थानी आहेत.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७९.६ अब्ज डॉलर्स आहे. दरम्यान, अंबानी यांच्या संपत्तीत देखील घसरण होण्यास रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर कारणीभूत ठरला आहे.

या यादीत अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझॉस अव्वल स्थानी आहेत. जेफ बेझॉस यांची संपत्ती १९९ अब्ज डॉलर्स आहे. त्याखाली १८८ अब्ज डॉलर्स संपत्तीसह टेस्लाचे मालक एलन मस्क आहेत.

तिसऱ्या स्थानी फ्रान्सचे उद्योजक बर्नाड अरनॉल्ट असून त्याची संपत्ती १७४ अब्ज डॉलर्स आहे. दुसरीकडे दुसरीकडे अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही याची झळ बसली असून, आठवडाभरात त्यांचे तब्बल २ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एनएसडीएलकडून स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी अदानी समूहातील शेअरमधील घसरण थांबलेली नाही.