PPF Scheme Latest Update: PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकार देणार ४२ लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 11:50 AM2023-03-05T11:50:47+5:302023-03-05T11:56:00+5:30

PPF Scheme Latest Update: केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातली एक योजना म्हणजे PPF योजना.

PPF Scheme Latest Update: केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. यातली एक योजना म्हणजे PPF योजना. या योजनेत पैसे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार आता गुंतवणूकदारांना ४२ लाख रुपये देणार आहे.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड एक उत्तम ऑप्शन आहे. यात सरकार गुंतवणूकदारांना गॅरंटी देते. यासह चांगला परतावाही देते.

दीर्घ मुदतीनुसार पैसे गुंतवण्यासाठी पीपीएफ योजना हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाची सुविधा मिळते. यासोबतच बाजारातील चढ-उतारांचा अशा सरकारी योजनांवर काहीही परिणाम होत नाही.

तुम्ही पीपीएफ योजनेत दरमहा ५००० रुपये गुंतवल्यास. यात संपूर्ण वर्षासाठी तुमची गुंतवणूक ६०,००० रुपये असेल. जर तुम्ही ते १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली असेलतर मॅच्युरिटीवर तुमचे पैसे १६,२७,२८४ रुपये होतील.

जर तुम्ही ५-५ वर्षांच्या मुदतीत पुढील १० वर्षांसाठी ठेव वाढवली तर २५ वर्षानंतर तुमचा निधी सुमारे ४२ लाख रुपये होईल. यामध्ये तुमचे योगदान १५,१२,५०० रुपये आणि व्याज उत्पन्न २६,४५,०६६ रुपये असेल.

तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही ते तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून कुठेही उघडू शकता. १ जानेवारी २०२३ पासून, सरकार या योजनेत ७.१ टक्के दराने व्याजाचा लाभ देत आहे आणि PPF योजनेची परिपक्वता १५ वर्षांची आहे.

या योजनेतील खातेदार ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये ते वाढवण्यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये, यात योगदान चालू ठेवण्याचा किंवा न ठेवण्याचा पर्याय देखील मिळतो.

तुम्हाला पीपीएफ स्कीममध्ये कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत तुम्ही कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. या योजनेतील व्याजातून मिळणारी रक्कमही करमुक्त आहे. या योजनेत ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्जही करू शकता.