सर्वसामान्यांना फटका... नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्याने CNG ही महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 01:36 PM2021-10-01T13:36:25+5:302021-10-01T14:01:17+5:30

नैसर्गिक वायूचा वापर खत, वीज निर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 43.5 रुपयांनी वाढविली आहे.

त्यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आदी ठिकाणी अन्न महाग होऊ शकते. याशिवाय खते आणि सीएनजी गॅसच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. त्यामुळेच, सीएनजी वापरकर्त्यांना महागाईचा फटका बसेल.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. पूर्वी ते 1693 रुपयांना होते.

घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत न बदलल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम वाहतूकीवर होणार आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांनाही याचा फटका बसणार आहे.

कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी ही किंमत 1770.5 रुपये एवढी होती.

महत्वाचे म्हणजे, पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेत असतात. तर, CNGच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, गुरुवारी सायंकाळी सरकारने नैसर्गिक गॅसच्या किंमतीत 62 टक्के वाढ जाहीर केली आहे.

नैसर्गिक वायूचा वापर खत, वीज निर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

Read in English