Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २३ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ७ राशींना सर्वोत्तम आठवडा; धनलाभासह सुखाचा काळ, दिवाळी शुभच ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:20 PM2022-10-23T12:20:02+5:302022-10-23T12:44:29+5:30

Weekly Horoscope: ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...

दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटकाळानंतर देशवासी आनंदात दिवाळी साजरी करताना पाहायला मिळत आहेत. (Weekly Horoscope Diwali 2022)

अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे मुख्य दिवस. ऑक्टोबरच्या या आठवड्यात लक्ष्मी पूजनासह, दिवाळी पाडवा, भाऊबीज साजरी केली जाणार आहे. (Diwali 2022)

यातच २३ ऑक्टोबरला शनी मकर राशीत मार्गी झाला आहे. तसेच याच आठवड्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध राशीपरिवर्तन करणार आहे. या एकंदरीत धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्योतिषीय दृष्ट्या महत्त्वाचा असलेला ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...

मेष राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा मध्यम फलदायी आहे. या आठवड्यात भूतकाळातील चुकांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपण कोठे चुकलो व त्यात काय सुधारणा करण्याची गरज आहे हे आपणास समजून घ्यावे लागेल. आपण हे करण्यात जर यशस्वी झालात तर आपण सर्व क्षेत्रात प्रगती करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडा थकवा जाणवेल. थोडी विश्रांती घ्यावी. नवीन व्यावसायिक सौद्यातून नफा मिळवू शकाल. भागीदार आपला व्यवसाय वाढविण्यात मदत करू शकतील. वैवाहिक जीवन प्रेम व रोमांसाने भरलेले असेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा आनंद देणारा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. वैवाहिक जोडीदाराची प्रकृती आपल्या काळजीत भर घालण्याची संभावना आहे. काही कारणाने कुटुंबियांशी आपले भांडण संभवते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण काही नवीन गोष्टी करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामात चांगले परिणाम मिळतील. खर्चात मोठी वाढ झाल्याने आपण चिंतीत होण्याची शक्यता आहे. योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे ठरेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून त्यांना अभ्यासात चांगले गुण मिळू शकतात.

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याची सुरुवात खूपच चांगली होईल. आपण कुटुंबावर आपले लक्ष केंद्रित करू शकाल. काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात मानसिक चिंता वाढतील. काही किरकोळ खर्च सुद्धा होतील. अनावश्यक प्रवास करणे टाळावे. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात आपली मेहनत वाढवावी लागेल. आपणास अतिरिक्त जवाबदारी घेण्याची तयारी ठेवावी लागेल. प्राप्तीत वाढ होईल. प्रकृती चांगली राहील. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा चांगला आहे. आपण ऑनलाईन व्यवसाय करण्याचा विचार कराल, जो आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांच्या कामास गती येईल. आपणास उपयुक्त ठरतील अशा दीर्घकालीन योजना आपण आखाल. नोकरी करणाऱ्यांनी ह्या आठवड्यात काळजीपूर्वक काम करावे. सावध राहावे. हा आठवडा विवाहितांसाठी खूपच चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. काहीजण उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यात यशस्वी होतील. प्रकृती उत्तम राहील. आठवड्याच्या मध्यास कुटुंबात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो किंवा एखाद्याची प्रकृती बिघडू शकते. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा आनंददायी असेल. आठवड्याच्या सुरुवातीस आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. कुटुंबात काही विशेष गोष्टींवर चर्चा होईल. शेजारी किंवा नातेवाईकांशी काही कारणाने वाद होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कामाचा भार वाढण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करून पुढे जाऊ शकाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास कार्यात यश प्राप्त होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा फायदा होईल. ते अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा चांगला आहे. परंतु, काही बाबतीत आपला गोंधळ होण्याची संभावना आहे. अशा परिस्थितीत अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार काम केल्यास आपल्याला फायदा होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैसा येईल. बँकेतील शिल्लक वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाची गती वाढवतील. आपली कामगिरी उत्तम झाल्याने आपणास लाभ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापारवृद्धीसाठी प्रवास करावा लागू शकतो.

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनात बदल होईल. प्राप्ती चांगली होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल. नोकरी करणाऱ्यांची कामात धावपळ होईल. व्यापारी आपल्या व्यवसायास पुढे नेण्यात यशस्वी होतील. कामानिमित्त आपण प्रवास करू शकाल. हा प्रवासच आपणास प्रगतीचा मार्ग दाखवू शकेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा सामान्य फलदायी आहे. आपणास चांगली प्राप्ती होईल. पण खर्चातही वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहिल्याने आपले व्यक्तिगत संबंध कमकुवत होण्याची संभावना आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडथळे दूर होऊन त्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असला तरी त्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागू शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. पैश्यांची गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे.

धनु राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा मध्यम फलदायी आहे. आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर तसेच आपल्या प्राप्तीत कशी वाढ करावी यावर केंद्रीत राहील. प्राप्तीत खूप मोठी वाढ होऊन खर्चात कपात होईल. आपण आर्थिक दृष्ट्या सबळ व्हाल. आपली प्रकृती सुद्धा उत्तम राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुदृढपणे वाटचाल करेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपणास मेहनत वाढवावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. आपणास अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा खूपच चांगला आहे. नशिबाची साथ मिळाल्याने कार्यात यश प्राप्त होईल. आपण जरी खूप प्रयत्न केलेले नसले तरी सुद्धा यशस्वी होण्याची संधी आपणास मिळेल. जे प्रयोग आपण करू इच्छिता ते करू शकाल. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामास गती येईल. आपणास बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन काही करण्याचा आहे. काही नवीन प्रयोग केल्याने आपणास लाभ होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या वागणुकीमुळे कुटुंबियांना त्रास होणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना एखाद्याच्या मार्गदर्शनाने चांगले यश प्राप्त होईल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या संबंधात वाढत जाणाऱ्या तणावामुळे एकमेकांतील अंतर वाढू शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. कामानिमित्त आपणास भरपूर प्रवास करावे लागतील. दीर्घ काळ प्रवास केल्याने आपणास थकवा जाणवेल. परंतु आपणास प्रवासाचे सकारात्मक परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करतील. तरीसुद्धा त्यांना नोकरीत बदल करावेसे वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा दिवाळीचा आठवडा मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस आपण आपल्या व्यवसायाच्या बाबतीत खूप चिंतीत व्हाल. शांत राहून काम करावे. असे केल्याने आपण आव्हानांना सहजपणे सामोरे जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठांशी काही ना काही कारणाने आपले भांडण होण्याची संभावना आहे, तेव्हा सावध राहावे. अन्यथा भांडणाचा परिणाम आपल्या कामगिरीवर होऊ शकते. विवाहितांना आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या वागणुकीत सकारात्मक बदल झाल्याचे जाणवेल. आनंदात वेळ घालवू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.