शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:51 IST2025-11-01T12:44:50+5:302025-11-01T12:51:27+5:30
Shukra Gochar 2025: ग्रह वेळोवेळी राशी बदलून गोचर अर्थात स्थलांतर करतात. या बदलांचा थेट परिणाम मनुष्य आणि राशीचक्रावर होत असतो. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच धन, ऐश्वर्य आणि सुखाचा कारक ग्रह शुक्र (Venus) आपली स्वत:ची रास असलेल्या तूळ राशीत प्रवेश करत आहे. हा प्रवेश ५ राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे.

२ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिकी एकादशी(Kartiki Ekadashi 2025) आहे आणि त्याच दिवशी दुपारी ०१ वाजून ०५ मिनिटांनी शुक्राचे गोचर(Shukra Gochar 2025) होणार आहे. शुक्राच्या स्वराशीत प्रवेशामुळे 'मालव्य राजयोग' (Malavya Rajyog) तयार होत आहे, जो ज्योतिष शास्त्रानुसार अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. या योगाच्या प्रभावाने व्यक्तीला धन, वैभव आणि ऐश्वर्य प्राप्त होते. याचा लाभ पुढील ५ राशीच्या लोकांना करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात मोठे लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.

१. मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर खूपच शुभ ठरणार आहे. काळात तुम्हाला मूलांकडून चांगली बातमी मिळू शकते. मातृपक्षाकडून किंवा इतर कोणत्याही अनपेक्षित ठिकाणाहून धनलाभाची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्न व बचतीत मोठी वाढ होईल. जोडीदारासोबतचे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

२. कन्या (Virgo) : कन्या राशीच्या लोकांसाठी हे गोचर भाग्याची पूर्ण साथ घेऊन येत आहे. नोकरीत पदोन्नतीचे (Promotion) योग बनत आहेत. करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी प्रवासाला जावे लागू शकते. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, मात्र पचनाच्या समस्या (Digestive Issues) टाळण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

३. धनु (Sagittarius) : धनु राशीच्या जातकांना हे गोचर करिअरमध्ये मोठे यश मिळवून देईल. तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा सन्मान होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे, ज्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि जीवनसाथीसोबतचा विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील.

४. मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी हे गोचर प्रगती आणि प्रवासाचे योग घेऊन आले आहे. करिअरमध्ये तुम्हाला सतत प्रगती दिसेल. कामाच्या निमित्ताने सतत प्रवास करावा लागू शकतो. व्यावसायिक स्तरावर तुम्हाला यश मिळेल आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून मान-सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे.

५. कुंभ (Aquarius) : कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्र गोचर जीवनात अधिक सुख-सुविधा घेऊन येणार आहे. करिअरमध्ये यश मिळेल आणि प्रवासाचे नवीन योग बनतील. व्यवसायात तुमच्या नेतृत्वाच्या क्षमतेचे कौतुक होईल. धनप्राप्तीची अधिक शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन सुखद राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत व समजूतदारपणाचे होतील. आरोग्य उत्तम राहील.

टीप: ज्योतिषीय गोचर हे ग्रहांच्या स्थितीवर आधारित सामान्य अंदाज असतात. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम बदलू शकतो.

















