Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:26 IST2025-06-09T15:57:18+5:302025-06-09T16:26:12+5:30
Vat Purnima 2025 Wishes in Marathi: १० जून रोजी वटपौर्णिमा (Vat Purnima 2025) आहे. प्रत्येक सौभाग्यवती आपल्या जोडीदाराची साथ साता जन्माची असावी म्हणून हे व्रत करते. वडाची पूजा करून त्याच्याप्रमाणे त्याच्यासाठी दीर्घायुष्य मागते. हे प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचवता यावे, म्हणून शेअर करा हे वटपौर्णिमा विशेष प्रेमाने ओथंबलेले शुभेच्छा संदेश!

Vat Purnima 2025 Wishes in Marathi
वटपौर्णिमेला सावित्रीने सत्यवानासाठी थेट यमाशी लढा दिला होता आणि त्याचे प्राण वाचवले होते. तीच ताकद आजच्याही प्रत्येक सावित्रीमध्ये आहे. फक्त तिचे प्रेम अव्यक्त राहू नये म्हणून या शुभेच्छा संदेशांचा वापर करता येईल.
Vat Purnima Messages in Marathi
तुझ्या डोळ्यात पाहते मी, स्वप्न सारे माझ्यासाठी, तुझ्या स्पर्शात रमून घेते, आजचा दिवस तुझ्यासाठी! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तुझे नाव माझ्या मनात आहे, आजही प्रेम आहे कायम आहे, तुझ्यासोबत आयुष्य जगणे, हाच माझा ध्यास आहे! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तू माझ्यासाठी एक स्वप्न, एक सुंदर कविता आहे, तुझ्यासोबत आयुष्याचा प्रत्येक क्षण, सुखासमाधानाचा आहे! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Vat Purnima Status in Marathi,
तू माझ्या जीवनातील रंग, माझ्या आयुष्याची नवी सुरुवात, तुझे प्रेम माझ्यासाठी, आपल्या प्रेमळ संसाराची रुजवात! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Vat Purnima Messages in Marathi
कधी आठवणीत लपलेलं, कधी अश्रूत सापडलेलं, हे प्रेमच असतं असं, जगणं शिकवणारं नि हरवून टाकणारं! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
तू नसतानाही तू सोबत असतोस, श्वासांमध्ये प्राण तूच भरतोस, हेच प्रेम असावं बहुधा, देह माझा तरी आत्मा तू असतोस! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
प्रेम म्हणजे दोघांनी मिळून, सप्तरंगांचं स्वप्न पाहणं, एकमेकांच्या कमतरता समजून, पूर्णत्वाच्या वाटा चालणं! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
शब्दांच्या पलिकडचं काही, डोळ्यांनी सांगितलेलं प्रेम, हृदयाच्या गाभ्यातलं नातं, न बोलता अनुभवलेलं प्रेम! साता जन्माच्या सोबतीसाठी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!