Vastu Shastra: महिलांनो, किचनमध्ये 'या' पाच गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर नवरा कर्जबाजारी होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 03:27 PM2023-08-11T15:27:33+5:302023-08-11T15:32:39+5:30

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराबाबतही अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. इथे महिलांचा वावर अधिक असल्याने त्यांनी ही काळजी घेणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांच्या पतीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल.

गृहस्थ जीवनात वास्तुशास्त्राची भूमिका महत्त्वाची असते. विशेषत: व्यक्तीने घर बांधताना वास्तूची काळजी घेतली पाहिजे. कारण, घराची वास्तू रचना योग्य नसेल तर घरात अशांतता येते. अशातच घराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. वास्तुशास्त्रानुसार महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी पाच नियम पुढीलप्रमाणे!

असे म्हणतात की जसे अन्न खातो तसे विचार बनतात. पण त्याचवेळी आणखी एक गोष्ट सांगितली जाते. म्हणजेच स्वयंपाक करताना ज्या भावना स्वयंपाक करणाऱ्याच्या मनात असतात, त्याच भावना खाणाऱ्याच्याही मनात तयार होतात. म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाक करणाऱ्याने दिशा लक्षात घेऊन स्वयंपाक करणे आवश्यक आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार दक्षिण दिशेला तोंड करून अन्न कधीही शिजवू नये. असे केल्याने स्वयंपाकी आणि खाणारा दोघांच्याही जीवनात दारिद्र्य येऊ शकते. याशिवाय या दिशेला उभे राहून स्वयंपाक केल्याने नेहमी डोकेदुखी, सांधेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार पश्चिम आणि दक्षिण दिशेशिवाय उत्तर दिशेला स्वयंपाक केल्यानेही नुकसान होऊ शकते. असे केल्याने घरामध्ये आर्थिक समस्या उद्भवू शकतात, एवढेच नाही तर दारिद्र्यही येऊ शकते.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड केल्यास ते सर्वात शुभ मानले जाते. कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते आणि या दिशेला सूर्यप्रकाश सर्वात आधी आणि वेगाने पसरतो असे मानले जाते. अशा परिस्थितीत, सर्वात सकारात्मक ऊर्जा देखील या दिशेने वास करते.

शेगडी हा किचनचा महत्त्वाचा घटक आहे, म्हणून ती नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. अन्यथा तुमच्या आर्थिक स्थितीवरदेखील वाईट परिणाम होऊ शकतो. अगदी आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावरही. म्हणून स्वयंपाक झाल्यावर ओटा स्वच्छ आवरून ठेवा आणि शेगडीही पुसून घ्या.

शक्यतो किचन हे थेट प्रमुख प्रवेश दारासमोर नसावे. तसे असल्यास मध्ये पडदा लावणे उत्तम. तसेच स्वयंपाक घराशेजारी बाथरूम, टॉयलेट असेल तर त्यातही पडदा आवश्यक आहे. हे केवळ दिसण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास आरोग्यावर व संपत्तीवर दुष्परिणाम होतो.