Camphor Upay Vastu Tips : कापरानं असा ठीक करा घरातील वास्तूदोष; होणार धनवृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:27 PM2022-03-03T12:27:30+5:302022-03-03T12:42:18+5:30

वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे.

कापूर (Camphor) विशेषत: पूजेमध्ये वापरला जातो. पण वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कापरचा छोटा तुकडा खूप फायदेशीर आहे.

कापराचा वापर केल्यानं अनेक वास्तूदोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कापूर वापरून तुम्ही तुमच्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता.

नोकरी-व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकल्यानंतर एका भांड्यात कापूर आणि लवंगा प्रज्वलित करा. असे केल्याने कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊ लागते आणि कामाच्या नवीन संधीही मिळू लागतात.

जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि तुमचा खर्च अधिक होत असेल किंवा तुमच्यावर अधिक कर्ज असेल तर तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो.

अशा स्थितीत तुमच्या स्वयंपाकघरातील चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगाचं मिश्रण करून धूप घालावा. असे रोज केल्याने तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमचे आर्थिक संकट दूर होईल. सोबतच असे केल्याने रखडलेली कामेही पूर्ण होतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला रोज कापूर प्रज्वलित आर्थिक समृद्धी राहते.

अनेकदा कुटुंबातील लोकांमध्ये आपापसात ताळमेळ चांगला असला तरी सदस्यांमध्ये काही गोष्टींवरुन नाराजी दिसून येते. अशातच दररोज देशी तुपात कापूर बुडूवून रोज प्रज्वलित करा.

यानंतर त्याचा सुगंध घरात सगळीकडे दरवळेल अशा ठिकाणी ते ठेवा. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुख शांतीचं वातावरण तयार होतं.

जर पती-पत्नीमध्ये अधिक मतभेद असतील तर रात्री झोपताना पतीच्या उशीखाली कापूर ठेवा. सकाळी कोणालाही न सांगता तो कापूर प्रज्वलित करा. असं केल्यानं दोघांमध्ये शांतता राहील आणि प्रेमही वाढेल. असं केल्यानं राहूचा प्रतिकूल प्रभाव दूर होतो.

घरात वास्तूदोष असल्यास आपल्या खोलीत कापूर ठेवा. जेव्हा तो पूर्णपणे संपेल तेव्हा त्याच्याजागी पुन्हा नवा कापूर ठेला. अशानं वास्तूदोषाचा सदस्यांवर होणारा परिणाम कमी होतो असं मानलं जातं. तसंच वास्तूदोषही हळूहळू दूर होतो. टीप - सर्व उपाय मान्यता आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहेत. कोणताही उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्या.