सूर्याचे राशीपरिवर्तन: २०२३ ची सुरुवात ‘या’ ५ राशींसाठी संमिश्र; नेमके काय करू नये? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:50 PM2022-12-12T13:50:18+5:302022-12-12T13:54:57+5:30

सूर्याच्या धनु संक्रांतीचा काळ काही राशीच्या व्यक्तींना संमिश्र ठरू शकतो. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

डिसेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य राशीपरिवर्तन करणार आहे. १६ डिसेंबर रोजी सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करत आहे. प्रत्येक महिन्याला सूर्याचे राशीसंक्रमण होत असते. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांत म्हटले जाते. (surya gochar dhanu rashi 2022)

सूर्याचा धनु प्रवेश होत असल्याने याला धनु संक्रांत असे संबोधले जाते. याला धनुर्मासारंभ असेही म्हटले जाते. काही मान्यतांनुसार, या धनुर्मासात शुभ कार्ये केली जात नाहीत. सूर्याचा धनु राशीतील प्रवेशाने काही शुभ योगही जुळून येतील, असे म्हटले जात आहे. गुरु आणि सूर्य एकमेकांचे मित्र ग्रह मानले जातात. (sun transit sagittarius 2022)

सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध आणि शुक्रही विराजमान आहेत. त्यामुळे धनु राशीत तीन ग्रहांचा शुभ योग जुळून येत आहे. १४ जानेवारी २०२३ पर्यंत सूर्य धनु राशीत असेल. यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करेल.

सूर्य धनु राशीत प्रवेश करेल तेव्हा काही राशींसाठी नवीन २०२३ वर्ष खूप फायदेशीर ठरणार आहे, तर काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काही राशींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात नेमके काय करू नये, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे गोचर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम देईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक किंवा पैशाचे मोठे व्यवहार टाळावेत. कोणतीही समस्या येत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याच्या मूळाशी जाणे उपयुक्त ठरू शकेल. परिस्थिती शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करा. खर्चावरही नियंत्रण ठेवा. अन्यथा आर्थिक संतुलन बिघडू शकते.

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्याचे गोचर मध्यम फलदायी ठरू शकतो. जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात. एखाद्या गोष्टीवरून वादही होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा. अन्यथा समस्या उद्भवू शकतात. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे गोचर संमिश्र ठरू शकते. अनेक चढ-उतार पाहायला मिळू शकतात. घाई किंवा निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वाद टाळा. शांत राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. प्रतिमा खराब होऊ शकते. कौटुंबिक सदस्यासोबत वाद होऊ शकतो. स्वतःला शांत ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचे गोचर संमिश्र परिणाम देईल. काम आणि कौटुंबिक जीवनात संतुलित ठेवा. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. नियमित तपासणी करा. कोणाशीही वादविवाद किंवा भांडणापासून दूर राहा. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. नोकरीमुळे घरापासून दूर जावे लागू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर काळात सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. टीकेचा सामना करावा लागू शकतो. गोष्टी योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. चैनी वस्तू आणि मनोरंजनावर जास्त खर्च करणे टाळावे. भविष्यातील योजनांचा विचार करावा. रागावर नियंत्रण ठेवा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.