'या' चार राशींच्या लोकांना हरवणे निव्वळ अशक्य; जाणून घ्या त्यांची बलस्थाने!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 04:47 PM2021-10-12T16:47:52+5:302021-10-12T16:59:01+5:30

व्यक्तीच्या रंग, रूप, गुणांचे, स्वभावाचे दर्शन घडते. या शास्त्रात १२ राशीनुसार लोकांच्या स्वभागाची विभागणी केली आहे. राशीनुसार व्यक्तिमत्त्वाचे विविध गुण जाणून घेता येतात, तसेच काही व्यक्तींपासून सावध पवित्रा देखील घेता येतो. अशाच चार महत्त्वाकांक्षी असणाऱ्या लोकांच्या राशीबद्दल जाणून घेऊया. त्यांच्याशी स्पर्धा करणे म्हणजे अपयशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. कारण जिंकणं हे त्यांच्या स्वभावातच असते.

बारा राशींमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होण्याचा मान या राशीला मिळाला आहे. हाच मान आयुष्यात प्रत्येक ठिकाणी मिळवण्यासाठी मेष राशीचे लोक धडपडत असतात. त्यांना तडजोड आवडत नाही. ते स्वतःला नवनवीन आव्हाने देतात आणि त्या आव्हानांची पूर्ती झाली नाही की स्वतःच नाराज होऊन नैराश्यात जातात. मात्र त्यांच्यात जिंकण्याची आणि सर्वोत्तम करून दाखवण्याची जिद्द दिसून येते.

'खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी' अशी आडमुठी रास आहे. त्यांना सगळ्या गोष्टी सर्वोत्तम प्रतीच्या लागतात. तसे ते बोलूनही दाखवतात. आपण वेगळे आहोत हे समोरच्यावर बिंबवण्यात यशस्वी होतात. ते ध्येयाशी एकनिष्ठ असतात. त्यासाठी हवी तेवढी मेहनत घेतात. मनासारखे यश मिळाले नाही तर पुन्हा नवीन आव्हानांना सामोरे जातात.

या राशीच्या लोकांना आपल्या वागणुकीने आणि व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने समोरच्यावर छाप पाडण्यात मजा येते. त्यांना लोकप्रियताही सहज मिळते. त्यांना सतत दुसऱ्यांशी स्पर्धा करायला आवडते. त्यांचे ध्येय निश्चित असते व ते मिळवण्यासाठी ते कोणतीही हयगय करत नाहीत. ते अपार मेहनत घेऊन स्वतःला योग्य सिद्ध करून दाखवतात.

हे लोक फणसासारखे वरून काटेरी आणि आतून मऊ असतात. संवेदनशील असतात. ते उघडपणे आपले ध्येय बोलून दाखवणार नाहीत पण कृतीतून ध्येयप्राप्ती करून दाखवतात. ध्येय मिळेपर्यंत ते तहान भूक विसरून मेहनत घेतात. त्यांचा आत्मविश्वास चांगला असतो. अपयशातूनही फिनिक्स पक्षासारखे भरारी घेत ते ध्येयापर्यंत पोहोचतात.