बुधाचे राशीपरिवर्तन: ६ राशींना राजयोग, यश-प्रगतीची संधी; १७ दिवस अपार लाभ, शुभ-फलदायी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:00 PM2023-06-05T14:00:46+5:302023-06-05T14:08:15+5:30

बुधाचा वृषभ राशीत होत असलेला प्रवेश नेमक्या कोणत्या राशींसाठी उत्तम ठरू शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह मेष राशीत विराजमान आहे. ०७ जून रोजी बुध मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत आताच्या घडीला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य विराजमान आहे. त्यामुळे बुध आणि सूर्याचा बुधादित्य योग जुळून आला आहे. हा एक प्रकारचा राजयोगही मानला गेला आहे.

बुध काही दिवसांसाठी वृषभ राशीत विराजमान असेल. त्यानंतर बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ०७ जून रोजी बुध वृषभ राशीत प्रवेश करणार असून, २४ जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत विराजमान होईल. तत्पूर्वी, १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सूर्य आणि बुधाचा बुधादित्य योग मिथुन राशीतही जुळून येणार आहे.

दरम्यान, शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत होत असलेला बुधाचा प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. बुद्धी, तर्क आणि यश, प्रगतीचा कारक मानला गेलेल्या बुध ग्रहाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल, असे सांगितले जात आहे. करिअर, नोकरी, बिझनेस यांमध्ये उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर बुधची कृपा राहू शकेल, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीत बुध प्रवेश करणार आहे. या राशीत बुध सुमारे १७ दिवस विराजमान असेल. या राशीच्या व्यक्तींना बुधाचा प्रवेश लाभदायक ठरू शकेल. पैशांची बचत करण्यात यश मिळू शकेल. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतील. तुम्हाला परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचे असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी बुद्धिमत्तेच्या जोरावर उत्कृष्ट कार्य करू शकाल. आरोग्यात सुधारणा होऊ शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधाचा वृषभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. वैवाहिक जीवनात सामंजस्य दिसून येऊ शकेल. नाते मजबूत होऊ शकेल. व्यवसायाशी संबंधित कामे यशस्वी ठरू शकतील. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. सन्मान वाढेल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकेल. धनसंचयात वाढ होऊ शकेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, योजना आखण्यास अनुकूल कालावधी ठरू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचा वृषभ प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. नोकरीत नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतील. नवीन ओळखी होऊ शकतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. नशिबाची साथ लाभू शकेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. सरकारी योजनांचा फायदा होऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकाल. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी रणनीतीत बदल करावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतील.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचा वृषभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबींमध्ये चांगले लाभ होऊ शकतील. व्यवसायात चांगली वाढ होऊ शकेल. प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. नशिबाची साथ लाभू शकेल. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहू शकेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नफा होण्याची शक्यता आहे. मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न होईल. पैशाची बचत करण्यात यश मिळू शकेल.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधाचा वृषभ प्रवेश फलदायी ठरू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. नोकरदारांना चांगल्या पगारवाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध दृढ होऊ शकतील. कार्यक्षेत्रात चांगले फायदे होऊ शकतील. सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले बातमी मिळू शकेल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकाल. सहलीला जाऊ शकतात. विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात.

मीन राशीच्या व्यक्तींना बुधाचा वृषभ प्रवेश लाभदायक ठरू शकेल. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकेल.परदेशातून नोकरीच्या संधी मिळू शकतील. परदेशात जायचे असल्यास इच्छा पूर्ण होऊ शकेल. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकेल. नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी असतील. मुलाच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने मनावरील ओझे हलके होऊ शकेल. बचत करण्यातही यशस्वी होऊ शकाल. कामे सहज आणि हुशारीने पूर्ण करू शकाल. मालमत्ता किंवा जमीन खरेदी करायची असेल तर इच्छा पूर्ण होऊ शकेल. वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.