५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 14:17 IST2025-07-03T14:06:30+5:302025-07-03T14:17:18+5:30
Ashadhi Devshayani Ekadashi 2025 Astrology: आषाढी एकादशीला अद्भूत योग जुळून येत असून, नेमक्या कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात? जाणून घ्या...

रविवार, ०६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत आहे. मराठी वर्षांत चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी ५ अद्भूत योग जुळून येत आहे. मिथुन राशीत सूर्य आणि गुरु यांच्या युतीने गुरु आदित्य योग जुळून येत आहे. हा एक राजयोग मानला जातो. याशिवाय आषाढी देवशयनी एकादशीला मालव्य, शुभ योग, साध्य योग, त्रिपुष्कर योग, रवि योग अशा प्रकारचे अनेक योग जुळून येत आहेत.
आषाढी एकादशीला जुळून येत असलेल्या योगांचा काही राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. विठुरायाची, श्रीविष्णूंची अपार कृपा लाभू शकते. नोकरी, व्यवसाय यामध्ये यश प्रगती साध्य करता येऊ शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
Taurus Horoscope in Marathi
वृषभ: मानसिक शांतता लाभू शकेल. आर्थिक आघाडीवर सुधारणा होऊ शकतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगले परिणाम मिळू शकतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित खरेदी करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे. फर्निचर, वाहन किंवा दागिने खरेदी करू शकता.
Cancer Horoscope in Marathi
कर्क: आर्थिक स्थिती सुधारू शकेल. आत्मविश्वास वाढू शकेल. भौतिक सुखे मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती, पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नफा होऊ शकतो. नवीन घराचे नियोजन करण्यासाठी किंवा फ्लॅट बुक करण्यासाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो.
Leo Horoscope in Marathi
सिंह: गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. पदोन्नती शक्य आहे. सामाजिक पातळीवर कीर्ती वाढू शकेल. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा परदेशातून नफा मिळण्याची शक्यता आहे. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहू शकेल.
Virgo Horoscope in Marathi
कन्या: काम आणि व्यवसायात प्रगती होऊन शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. आर्थिक, कौटुंबिक आणि भौतिक पातळीवर सुखद बदल दिसून येऊ शकतील. जुना मालमत्तेचा वाद मिटू शकतो. वाहन खरेदी करण्याच्या योजना यशस्वी होऊ शकतात. शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवलेले पैसे किंवा दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल.
Sagittarius Horoscope in Marathi
धनु: आर्थिक प्रगतीची संधी मिळू शकेल. परदेशाशी संबंधित व्यापारात नफा होऊ शकेल. करिअरमध्ये पदोन्नती, पगार वाढ होऊ शकेल. नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा प्रवासाला लागणाऱ्या वस्तुंची खरेदी करू शकता. धार्मिक स्थळांना दिलेली भेट मानसिक शांतता देणारी ठरू शकेल.
Aquarius Horoscope in Marathi
कुंभ: मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. ज्ञानामुळे चांगले नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकता. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणारे लोक प्रगती करू शकतात. प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते.
Piscus Horoscope in Marathi
मीन: संपत्तीत वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात अचानक नफा होऊ शकतो. सरकारी कामात यश, पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी प्रशंसा, पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता कमी होईल. जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांना भागीदारीतून फायदा होईल. आर्थिक योजना फलदायी ठरू शकतील.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.