जबरदस्त तंत्रज्ञान, 250Kg लोडिंग, 120kms ची ड्रायव्हिंग रेंज; लवकरच दाखल होणार नवी Electric Scooter

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:31 PM2021-07-12T13:31:52+5:302021-07-12T13:36:59+5:30

Electric Scooter : देशात सध्या वाढत आहे Electric वाहनांची मागणी. अनेक स्टार्टअप कंपन्या उतरल्यात शर्यतीत.

सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या क्षेत्रात अनेक स्टार्टअप्स प्रवेश करत आहेत. अनेक कंपन्यांची वाहनं ग्राहकांच्या पसंतीसही येत आहेत.

नव्या आयडिया आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं दुचाकी सेगमेंटमध्ये स्टार्टअप कंपन्या नवी उत्पादनं सादर करण्याच्या तयारीत आहे.

देशातील प्रमुख स्टार्टअप कंपनी Zypp Electric लास्ट माईल डिलिव्हरी सेगमेंटमध्ये एक पॉवरफुल इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं आपल्या अधिकृत बेबसाईटवर याचा एक टीझरही समोर आणला आहे.

डोअर टू डोअर असा बिझनेस असलेल्या व्यक्तींसाठी वस्तूंची डिलिव्हरी करताना ही स्कूटर अतिशय उपयुक्त पडणार आहे. तर दुसरीकडे अनेकदा आपल्याला असं वाटत असतं की स्कूटर ही अधिक वजन घेऊ शकणार नाही.

तसंच अधिक वजन असल्याचा त्याचा परिणाम त्याच्या ड्रायव्हिंग रेंजवरही होताना दिसतो. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार ही इलेक्ट्रीक स्कूटर 250kg पर्यंत भार उचलू शकते. अशा परिस्थितीत या स्कूटरची ड्रायव्हिंग रेंजही 120kms पर्यंत असेल.

कंपनी या स्कूटरमध्ये 40 Ah क्षमतेच्या बॅटरीचा वापर करत आहे. कंपनी सुरूवातीच्या टप्प्यात ही स्कूटर दिल्ली एनसीआरमध्ये लाँच करणार आहे.

तसंच यानंतर ती अन्य शहरांमध्ये लाँच केली जाईल. ही इलेक्ट्रीक स्कूटर बॉक्स, पेट बॉटल्स, सिलिंडर, हेवी लोड शिपमेंट, किराणा सामान आणि मोठ्या बॅग आणि ई-कॉमर्सच्या शिपमेंटसाठी उपयुक्त आहे.

या स्कूटरमध्ये डिजिटल इंन्स्ट्रूमेंट कन्सोल, मेटल बॉडीवर्क मिळतं. तसंच पुढील सीटवर सहजरित्या क्रेट्स आणि बॅग्स उचलता येऊ शतात.

याचा वापर बाईक टॅक्सीच्या रुपातही केला जाऊ शकचोय ट्रान्सपोर्ट बिझनेससाठी ड्रायव्हर आणि व्हेईकल दोघांना ट्रॅक करणं आवश्यक आहे.

त्यामुळे या स्कूटरमध्ये कंपनीनं IoT अनेबल्ड फीचर दिले आहे. त्याच्या सहाय्यानं ही स्कूटर ट्रॅक केली जाऊ शकते.