TATA च्या Electric Car ची ग्राहकांमध्ये क्रेझ; ३१५ किमीची ड्रायव्हिंग रेंज; महिन्याला २ हजार बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 07:54 PM2021-09-06T19:54:41+5:302021-09-06T20:01:37+5:30

Electric Vehicles In India : सध्या अनेक ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहे. दिग्गज वाहन कंपन्याही आता इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनावर भर देण्याच्या प्रयत्नात आहेत.

भारतीय ऑटो सेक्टर आता तेजीनं इलेक्ट्रीफाईड होण्याच्या दिशेनं पुढे जात आहे. देशातील दिग्गज वाहन उत्पादक कंपन्या आता इलेक्ट्रीक वाहनांचंदेखील उत्पादन करू लागल्या आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रीक वाहनांसारख्या पर्यायांकडेही वळ आहेत.

देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी TATA Motors नं देशांतर्गत बाजारात आपली दुसरी इलेक्ट्रीक कार Tigor EV लाँच केली आहे. कंपनीची पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही TATA Nexon EV यापूर्वीपासूनच बाजारात उपलब्ध आहे.

टाटा मोटर्सची इलेक्ट्रीक एसयूव्ही नेक्सॉन ईव्ही ग्राहकांच्या पसंतीस येत आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लाँच झाल्यापासून, कारच्या 6,000 हून अधिक युनिट्सची विक्री करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

सध्या इलेक्ट्रीक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढच आहे. तर दुसरीकडे नेक्सॉनचं इलेक्ट्रीक मॉडेल हे कंपनीच्या नेक्सॉन डिझेल या मॉडेललाही टक्कर देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

कंपनीला दर महिन्याला २ हजारांपेक्षा अधिक बुकिंग मिलत आहे. जेव्हा आम्ही ही कार लाँच केली तेव्हा दर महिन्याला ३०० बुकिंग मिळत होत्या. परंतु आता देशात इलेक्ट्रीक मोटर्सची मागणी वाढत आहे आणि ग्राहक टाटा मोटर्सवर विश्वास ठेवत आहेत, अशी प्रतिक्रिया टाटा मोटर्सचे प्रवासी वाहतूक व्यवसाय विभागाचे शैलेश चंद्रा यांनी दिली.

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रीक एकूण पाच व्हेरिअंट्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. त्याची किंमत 13.99 लाख ते 16.85 लाखांपर्यंत आहे. अलीकडेच, Nexon EV अपडेट करताना, काही विशेष फीचर्स जोडण्यात आले आहेत. आता यामध्ये बटण लेस आणि डायल-लेस इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. हा सांत इंचाचा डिस्प्ले आहे जो टाटाच्या कनेक्ट नेक्स्ट ऑपरेटिंग सिस्टम (OS) देण्यात आली आहे.

कंपनीने या एसयूव्हीमध्ये मजबूत बॅटरी पॅकसह काही आकर्षक वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केली आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो हायलाइट्स, इलेक्ट्रीक सनरूफ, पार्क असिस्ट, ऑटो रेन सेन्सिंग वायपर, इलेक्ट्रीक टेलगेट असे फीचर्सही देण्यात आले आहेत.

यामध्ये कंपनीने 30.2 kWh क्षमतेची लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक देण्यात आली आहे. त्यात दिलेली इलेक्ट्रीक मोटर 127bhp ची दमदार पॉवर आणि 245Nm चा टॉर्क जनरेट करते.

कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रीक एसयूव्ही एका चार्जमध्ये 315 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. ही इलेक्ट्रीक एसयूव्ही फास्ट चार्जिंग सिस्टीमसह फक्त 1 तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, याशिवाय कारची बॅटरी नियमित चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 9 तास लागतात. ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रीक कार आहे.