कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! TATA कंपनीकडून मिळतोय मोठा डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 01:53 PM2022-03-05T13:53:04+5:302022-03-05T14:10:13+5:30

tata motors : नीने 2021 मॉडेलवर मोठ्या ऑफर दिल्या आहेत. तसेच, टाटा नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि पंच मायक्रो एसयूव्हीवर कोणतेही फायदे दिलेले नाहीत.

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने मार्च 2022 मध्ये ग्राहकांना आपल्या कार आणि एसयूव्हीवर शानदार ऑफर दिल्या आहेत. यामध्ये टाटा टियागो, टिगोर, नेक्सॉन, सफारी आणि हॅरियर यांचा समावेश आहे. कंपनीने या सर्व वाहनांवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर दिल्या आहेत, ज्या 2021 मॉडेल आणि 2022 मॉडेलवर दिल्या जात आहेत. दरम्यान, कंपनीने 2021 मॉडेलवर मोठ्या ऑफर दिल्या आहेत. तसेच, टाटा नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि पंच मायक्रो एसयूव्हीवर कोणतेही फायदे दिलेले नाहीत.

कंपनीची ही दमदार एसयूव्ही एकूण 85,000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकली जात आहे, जी त्याच्या 2021 मॉडेलवर दिली जात आहे. यामध्ये 60,000 रुपयांच्या फायद्यांमध्ये 20,000 रुपयांची रोख सवलतीचा समावेश आहे. 2022 मॉडेल टाटा हॅरिअरवर एकूण 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. कंपनीने एसयूव्हीवर 25,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील उपलब्ध करून दिली आहे.

ग्राहकांच्या आवडत्या टाटा सफारीच्या 2021 मॉडेलवर एकूण 60,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे, तर 2022 मॉडेलवर कंपनीने या शक्तिशाली एसयूव्हीवर 40,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. टाटा सफारीवर कोणतीही कॉर्पोरेट सूट दिली जात नाही.

कंपनीने मार्चमध्ये या सेडानवर एकूण 35,000 रुपयांच्या ऑफर दिल्या आहेत, ज्यामध्ये 2021 मॉडेलवर ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत ऑफर देण्यात आल्या आहेत. कारच्या 2022 मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. कंपनीने कारवर 10,000 रुपयांपर्यंत वेगळी कॉर्पोरेट सूटही दिली आहे.

ही कंपनीची सर्वात परवडणारी हॅचबॅक आहे, ज्यावर ग्राहकांना एकूण 30,000 रुपयांपर्यंतचे फायदे देण्यात आले आहेत. कारच्या 2021 मॉडेलवर 25,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देण्यात आल्या आहेत, तर 2022 मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कंपनीने या हॅचबॅकवर 5,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली आहे.

ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे आणि गेल्या महिन्यात ती भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. नेक्सॉनच्या 2021 च्या डिझेल मॉडेलवर 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात आला आहे, तर 2022 च्या मॉडेलवर कोणताही लाभ देण्यात आलेला नाही. याशिवाय, नेक्सॉन पेट्रोलवर 5,000 रुपयांपर्यंत आणि नेक्सॉन डिझेलवर 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.

या महिन्यात टाटाच्या प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोज​​वर कॅश आणि एक्सचेंज बोनस दिलेला नाही. ही कार केवळ कॉर्पोरेट डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यात टर्बो-पेट्रोल व्हेरियंटवर 10,000 रुपयांपर्यंत सूट आणि नॅचरली अॅस्पिरेटेड व्हेरिएंटवर 7,500 रुपयांपर्यंत सूट आहे.