Safety Tricks For Cars : उन्हाळ्यात 'अशी' घ्या आपल्या कारची काळजी; फॉलो करा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 09:45 AM2021-05-05T09:45:25+5:302021-05-05T09:50:42+5:30

Safety Tricks For Cars in Summer : जाणून घेऊया कशाप्रकारे तुम्ही ठेवू शकता तुमची कार सुरक्षित

आपली स्वत:ची कार असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कार असली तरी तिची काळजी घेणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीत गाडीच्या टायर्समधलं प्रेशर आपल्या आपण वाढतं. यामुळे गाडी चालवताना ते फुटण्याचीही भीती असते.

याशिवाय गादी अधिक गरम झाल्यानं ती बंद होण्याचीही भीती असते. त्यामुळे गाडी खरेदी करताना तिच्या कलरची निवड करणंही तितकंच महत्त्वाचं असतं.

गरमीमध्ये गाड्यांच्या रंगावरही परिणाम होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया उन्हाळ्याच्या कालावधीत गाडीची काळजी नक्की कशी घेता येईल.

जेव्हा आपण कुठेही प्रवास करत नसता, तेव्हा आपली कार गॅरेजमध्ये ठेवण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. परंतु प्रवासादरम्यान आपल्याला बाहेर कोठे तरी पार्क करावी लागते.

अशा वेळी उन्हात गाडी उभी केल्यास गाडीच्या रंगावर परिणाम होण्याची भीती असते. याशिवाय गाडी अधिक गरमही होऊ लागते.

अशा परिस्थितीत तुमची गाडी सावली असलेल्या ठिकाणी पार्क करा. याशिवाय अधिक कालावधीसाठी तुम्ही कार पार्क करणार असाल तर गाडीसाठी मिळणारी छत्रीही तुम्ही घेऊ शकता.

उन्हाळ्यात तुमच्या कारच्या रंगावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे कारला अल्ट्राव्हॉयलेट युव्ही प्रोटेक्शन असलेलं पॉलिश करून घ्या.

यामुळे कारच्या रंगावर कोणताही परिणाम होणार नाही. तसंच पक्षांद्वारे किंवा अन्य कोणत्या गोष्टीमुळे जर गाडी खराब झाली तर कारच्या रंगावर त्याचा परिणाम होणार नाही.

गाड्यांच्या काचेवर सनशेडचा वापर करून गाडी गरम होण्यापासून वाचवू शकता. काचेवर सनशेडचा वापर केल्यानं गाडीच्य़ा आतल्या बाजूला असलेल्या प्लॅस्टिकची सुरक्षा केली जाऊ शकते.

गरमीममध्ये कारच्या टायरचं प्रेशर वाढतं. त्यामुळे ते फुटण्याचीही शक्यता असते. यासाठीही काळजी घेणं आवश्यत आहे.

दर आठवड्याला टायरचं प्रेशर तपासून पाहू शकता. तसंच आवश्यकता असल्यास टायरमध्ये साध्या हवे ऐवजी नायट्रोजनही भरू शकता.

गरमीमध्ये गाडीच्या कुलेंटची काळजी घेणं अधिक आवश्यक आहे. कारण गाडीचं इंजिन थंड ठेवण्यात ते मोठी मदत करतं.