28kmplचे मायलेज देणाऱ्या मारुतीच्या 'या' SUV वर बंपर सूट, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 08:05 PM2022-11-13T20:05:52+5:302022-11-13T20:10:07+5:30

तुम्ही चांगले मायलेज देणारी नवीन गाडी घेण्याच्या विचारात असाल, तर या हायब्रिड SUVवर बंपर सूट मिळत आहे.

Grand Vitara Hybrid SUV: तुम्ही चांगले मायलेज देणारी नवीन गाडी घेण्याच्या विचारात असाल, तर मारुती सुझुकीची Grand Vitara Hybrid SUV एक चांगला पर्याय आहे. सध्या कंपनीने या हायब्रिड SUVवर बंपर सूट जाहीर केली आहे. या मॉडेल व्यतिरिक्त, मारुती सुझुकी त्यांच्या इतर अनेक मॉडेल्सवर देखील मोठी सूट देत आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही भारतीय बाजारातील नवीन कार आहे. या मध्यम आकाराच्या SUV साठी कंपनीकडे अनेक बुकिंग येत आहेत. यावरुन बाजारात या हायब्रिड कारची मागणी खूप जास्त असल्याचे दिसून येते. ऑक्टोबर 2022 पर्यंत कंपनीने या SUV च्या 4,770 युनिट्सची डिलिव्हरी केली होती.

ही हायब्रीड कार खरेदी करण्यासाठी कंपनीने ग्राहकांना मोठी संधी दिली आहे. कंपनी नोव्हेंबरमध्ये Maruti Suzuki Grand Vitara वर 39,000 रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही ऑफर फक्त SUV च्या स्ट्रॉन्ग-हायब्रिड व्हर्जनवर उपलब्ध आहे.

या नवीन मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 19.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. या SUVची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos आणि नुकतीच लाँच झालेल्या Toyota Urban Cruiser Hyryder, MG Astor, VW Taigun आणि Skoda Kushaq यांच्याशी आहे.

ही टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर एसयूव्हीसारखीच आहे. या SUV ला दोन इंजिन पर्याय आहेत. एक 1.5-लीटर माइल्ड हायब्रिड पेट्रोल इंजिन आणि दुसरे 1.5-लीटर स्ट्रॉन्ग हायब्रिड पेट्रोल इंजिन, जे सुमारे 28kmpl मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे.

मारुती सुझुकी आपल्या लाइनअपमधील इतर वाहनांवरही सूट देत आहे. S-Press आणि Alto K10 वर 30,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 15,000 रुपयांचे एक्सचेंज इन्सेंटिव्ह आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. Celerioवर ग्राहकांना 45,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल, तर Alto 800 वर 20,000 रुपयांपर्यंत सूट आहे.