कारसाठी मिळाला बॉडीगार्ड! तुमची कार कुठे गेली, सर्व माहिती मिळणार, FasTag ने आणलं नव फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 02:54 PM2023-04-05T14:54:22+5:302023-04-05T14:57:22+5:30

फास्टॅगचे एक छुपे फिचर आले आहे. याबद्दल जास्त कुणाला माहिती नाही.

गेल्या काही महिन्यांपूर्वी देशात वाहनांमध्ये फासटॅगचा वापर सुरु केला आहे. यामुळे आता टोल टॅक्स भरण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे, त्याचबरोबर सरकारची टोलवसुलीही वाढली आहे. तुम्ही FasTag द्वारे ऑनलाइन टोल भरता. यामुळे टोल प्लाझावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही.

या सर्व फिचरव्यतिरिक्त, फास्टॅगचे एक छुपे फिचर देखील आहे, याबद्दल अनेकांनी माहिती नाही.

या फीचरच्या माध्यमातून तुम्ही अडचणीच्या वेळी तुमच्या वाहनाला ट्रक करु शकता. हे फिचर तुमच्या वाहन कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती पाठवते. चला फीचरबद्दल जाणून घेऊया.

फास्टॅग हे एक प्रकारचे स्टिकर आहे जे तुमच्या वाहनाच्या विंडस्क्रीनवर चिकटवले जाते. हे रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर काम करते.

तुम्ही टोल टॅक्सवर पोहोचताच, हा FASTag तिथे उपस्थित असलेल्या एका यंत्राद्वारे स्कॅन केला जातो आणि डोळ्याच्या झटक्यात, FASTag मधील शिल्लक रकमेतून टोल टॅक्स कापला जातो.

लोक फास्टॅगला फक्त टोल डिव्हाईस म्हणून पाहतात. पण तो तुमच्या कारचा बॉडीगार्डही आहे. जेव्हाही तुम्ही तुमच्या कारसह टोलमधून जात असता, तेव्हा FASTag द्वारे टोल टॅक्स वसूल केला जातो आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक मेसेज पाठवला जातो.

या मेसेजमध्ये टोल टॅक्सच्या रकमेचाच उल्लेख नाही, तर टोलचे ठिकाणही नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच तुमची गाडी जिथून जाईल तिथून गाडी कोणत्या भागात असू शकते याची कल्पना येऊ शकते.

यामुळे तुम्हाला तुमची कार कुठे आहे याची माहिती तुम्हाला मिळते.