मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:47 PM2024-05-17T20:47:29+5:302024-05-17T20:48:51+5:30

'नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो की, ते होते म्हणून आज राम मंदिर तयार झाले, अन्यथा ते झाले नसते.'

Maharashtra Lok Sabha Election:Marathi language, Constitution, fort and...Raj Thackeray's demands to PM Modi from the platform of Mahayuti | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या

Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा झाली. राज्यातील महायुतीच्या या सांगता सभेत पंतप्रधान मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणा विरोधकांवर टीका करण्यासोबतच पंतप्रधान मोदींना पाच मागण्या केल्या.

PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

आपल्या भाषणाची सुरुवात करताना राज ठाकरे म्हणाले की, 'पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत, मी त्यांचे स्वागत करतो. 2014-2019 च्या मोदींच्या कार्यकाळाबद्दल जे बोलायचे होते, ते मी 2019 ला बोललो. आता 2019 ते आत्तापर्यंतचे बोलू. बाबरी मशिद पाडली, तेव्हा कारसेवकांना ठार मारण्यात आले. मला वाटले नव्हते की, राम मंदिर बनेल. पण, मी नरेंद्र मोदींना धन्यवाद देतो की, ते होते म्हणून आज राम मंदिर तयार झाले, अन्यथा ते झाले नसते.'

'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू-काश्मीरचा मुद्दा तसाच होता. पण मोदींनी कलम 370 हटवले आणि आज खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीर भारताचा भाग झाला आहे. पंतप्रधान मोदींनी देशातून ट्रिपल तलाकसारखा कायदा रद्द केला आणि या देशातील सर्व मुस्लीम महिलांना न्याय मिळून दिला. त्या मुस्लिम महिलांमद्ये समाधानाचे वातावरण तयार झाले. मी या सर्व गोष्टींना सर्वांत धाडसी निर्णय मानतो,' असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान मोदींना पाच मागण्या केल्या.

पंतप्रधान मोदींसमोर राज ठाकरेंनी मांडल्या 'या' मागण्या
1. अनेक वर्षांपासून खितपत पडलेला प्रश्न म्हणजे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मराठी भाषेला मिळेल अशी अपेक्षा करतो.
2. या देशातील शालेय शिक्षणात मुलांना मराठा साम्राज्याचा इतिहासात शिकवला जावा.
3. छत्रपतींची खरी स्मारके गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांना पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करण्याकरता आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. 
4. गेली 18-19 वर्षे मुंबई गोवा महामार्ग अजूनही तसाच आहे, तो लवकरात लवकर व्हावा.
5. या भारतामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या संविधानाला धक्का कुणी लावणार नाही, हे विरोधकांना खडसावून सांगा आणि त्यांची तोंडं एकदाची बंद करा.
6. या भारतात अनेक देशभक्त मुसलमान आहेत, जे या देशावर प्रेम करतात. पण, काही मूठभर आहेत, जे उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला पाठिंबा देतात. त्यांना गेल्या 10 वर्षात डोकं काढता आलं नाही. त्यांचे अड्डे तपासून घ्या, तिथं माणसं, सैन्य घुसवून अड्डे नष्ट करा.
7. मुंबई रेल्वेकडे लक्ष द्या, त्यासाठी जास्तीत जास्त पैसे द्या, अशा मागण्या राज ठाकरेंनी मोदींना केल्या.

तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Web Title: Maharashtra Lok Sabha Election:Marathi language, Constitution, fort and...Raj Thackeray's demands to PM Modi from the platform of Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.