Car care tips: भर उन्हातही तुमची कार ठेवा थंड; या टिप्स फॉलो करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:26 PM2021-02-22T13:26:16+5:302021-02-22T13:30:14+5:30

Tips For Keeping Your Car Cool In The Heat : फेब्रुवारी संपत आला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेकांच्या गाड्या या उन्हात उभ्या असतात. इमारतीखाली पार्किंग नसेल तर रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कार पार्क करावी लागते. काही कामानिमित्त गेलात तर पुन्हा कारमध्ये येताना प्रचंड उष्णता जाणवते.

फेब्रुवारी सुरु झाला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेकांच्या गाड्या या उन्हात उभ्या असतात. इमारतीखाली पार्किंग नसेल तर रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कार पार्क करावी लागते. काही कामानिमित्त गेलात तर पुन्हा कारमध्ये येताना प्रचंड उष्णता जाणवते.

यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, याद्वारे तुम्ही तुमची कार आतून एकदम थंड नाही परंतू जेवढी तापलेली असते त्यापेक्षा कितीतरी पटीने थंड ठेवता येणार आहे.

हे एकप्रकारचे कव्हर असते जो कारच्या खिडकीच्या वर चिकटवले जाते. जर हे टिटिंग असेल तर बाहेरील उष्णता तुमच्या कारमध्ये जाणार नाही.

गाडीचे तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा दुप्पट, तिप्पट होते. कारण आतमध्ये प्लॅस्टिक असते. यामुळे काच बंद केलेली असेल तर तो एक चेंबर होतो. आतमध्ये तसेच कोणी बसून असेल तर त्याला श्वास घेतानाही त्रास होतो. अनेकदा लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील.

असे अप्रिय प्रकार टाळण्यासाठी किंवा जर तुमची कार उन्हात असेल आणि ती थंड ठेवण्यासाठी गाडीच्या काचा काही प्रमाणात खाली करून ठेवा. असे केल्याने आतील हवा खेळती राहील. या काचा एवढ्याच खाली करा की आतमध्ये कोणाचा हात जाणार नाही.

जर तुमची कार नेहमी उघड्यावर पार्क करावी लागत असेल तर कारसाठी एक चांगले कव्हर घ्या. सुर्याची थेट किरणे आतमध्ये जाणार नाहीत याची काळजी घेतल्यास कारचा रंगही सुरक्षित राहिल.

कारमध्ये बसल्याबसल्या एसी ऑन करत असाल तर त्याचा मोड हा फ्रेश एअरचा ठेवा. जेव्हा कारचे तापमान सामान्य होईल तेव्हा रिसर्क्य़ुलेशन मोड सुरु करा. असे केल्याने कार थंड होईलच परंतू अन्य प्रकारचा तांत्रिक बिघाडही येणार नाही.

उन्हाळ्यात गाडीमध्ये दोन किंवा तीन टॉवेल ठेवणे फायद्याचे असेल. आता असे का म्हणाल? तर सुर्याची किरणे थेट डॅशबोर्डवर पडली तर उष्णता वाढते. यामुळे त्यावर तसेच सीटवर आणि स्टेअरिंगवर टॉवेल ठेवले तर तुम्ही उन्हाच्या चटक्यांपासून वाचू शकता.

याचबरोबर कार थंड राहिल आणि कारमध्ये धूळ गेल्याने इंटेरिअरही खराब होणार नाही.

चला तर मग, यापैकी काही उपाय करा आणि उन्हाळ्याची मजा घ्या...आणखी अशाच काही वेगवेगळ्या विषयांवरच्या टिप्स घेऊन आम्ही तुमच्या मदतीला येऊच.