'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त BMW बाईक, किंमत 3 लाखांपेक्षा कमी; पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 04:08 PM2023-12-29T16:08:26+5:302023-12-29T16:13:29+5:30

BMW G 310 R: तुम्ही BMW बाईक घेण्याच्या विचारात असाल, तर ही बाईक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

Cheapest BMW Bike- BMW G 310 R: BMW म्हणजे उत्तम ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, दमदार फीचर्स अन् उच्च किंमत. कार असो वा बाईक, भारतातील बहुतांश लोकांना BMW हवी असते. भारतीय तरुणांमध्ये तर BMW बाईकची खुप क्रेझ आहे. पण, कंपनीच्या बाईक्स महाग असल्यामुळे सर्वांनाच परवडत नाहीत.

पण, आता तुम्ही अवघ्या 3 लाख रुपयांमध्ये BMW बाईक घरी आणू शकता. BMW G 310 R, ही भारतातील सर्वात स्वस्त BMW बाईक आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमत फक्त 2.90 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. बाजारात या बाईकची स्पर्धा KTM 390 Duke, Royal Enfield Interceptor 650 आणि Honda CB300R सारख्या बाइक्सशी आहे.

या बाईकमध्ये 313cc लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 34PS आणि 28NM जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. बाईकमध्ये 11 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे. तसेच, या बाईकचे वजन 158.5 किलो आहे. ही बाईक 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 8.01 सेकंदात पकडू शकते.

बाईकला पुढील बाजूस 41 मिमी अपसाइड डाउन (USD) टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आहे, तर मागील बाजूस प्रीलोड मोनोशॉक सस्पेंशन आहे. ब्रेकिंगसाठी यात ड्युअल चॅनल एबीएस आणि दोन्ही बाजुस 300 मिमी आणि 240 मिमी सिंगल डिस्क ब्रेक आहेत. यात 17-इंच अलॉय व्हील आहेत, जे मिशेलिन पायलट स्ट्रीट टायर्ससह येतात.

बाईकमध्ये LED डीआरएल आणि टर्न इंडिकेटरसह ऑल-एलईडी लायटिंग, राइड-बाय वायर थ्रॉटल, स्लिपर क्लच, अॅडजस्टेबल ब्रेक्स आणि क्लच लीव्हर्स यांसारखे फीचर्स आहेत. तसेच, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, BMW Motorrad ABS, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर, पास स्विच आणि इंजिन किल स्विच देखील आहे.