Rohit Pawar: ...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 05:01 PM2022-04-22T17:01:55+5:302022-04-22T17:08:44+5:30

एकमेकांवर कायम टिका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. स्वत: रोहित पवार यांनीच फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टिका करण्याची एकही संधी भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर करत नाहीत. विशेष म्हणजे रोहित पवार यांच्यावरही त्यांनी अनेकदा टिका केली आहे.

रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यावरुन पळडकर यांनी एकदा रोहित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी, आमदार पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांना उत्तर दिलं.

एकमेकांवर कायम टिका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. स्वत: रोहित पवार यांनीच फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

विधिमंडळाच्या 'विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती'ने माझ्या मतदारसंघात आज भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम जी मोरे आणि सदस्य आमदार संजय दौंड, डॉ.रत्नाकर गुट्टे, गोपीचंद पडळकर आणि बळवंत वानखेडे या सर्वांचं जामखेडमध्ये स्वागत केलं.

या समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर समितीने काही ठराविक कामांनाही भेट दिली.

यावेळी जामखेडमध्ये डीपीसी अंतर्गत मंजूर झालेल्या शाळा खोल्यांच्या कामाचं समिती सदस्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं.

त्यानंतर वेळ मिळाल्याने ऐतिहासिक खर्ड्याच्या किल्ल्याला भेट दिली आणि इथं उभारलेल्या देशातील सर्वांत उंच भगव्या स्वराज्य ध्वजाची पाहणी केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

संत श्री सिताराम बाबा आणि संत श्री गीतेबाबा या दोन्ही गडावरील समाधीचं दर्शन घेऊन इथं सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी पडळकर यांच्यासमवेत केल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.