शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

फेरफाराची प्रतीक्षा; शेतकऱ्याचा मृत्यू,सहा वर्षांनंतरही फेरफार अर्ज प्रलंबितच; असंवेदनशील कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:19 IST

शेत जमीनीचा फेरफार अर्ज तलाठी यांच्याकडे देणे व तो अर्ज मंजूर होणे हे तसे सोपे काम; परंतु, तालुक्यातील कोथाळा येथील कै. नागोराव गोरे यांनी फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल पाच वर्षे उलटली.

- सत्यशील धबडगेमानवत (जि. परभणी) : शेत जमीनीचा फेरफार अर्ज तलाठी यांच्याकडे देणे व तो अर्ज मंजूर होणे हे तसे सोपे काम; परंतु, तालुक्यातील कोथाळा येथील कै. नागोराव गोरे यांनी फेरफार अर्ज दाखल केल्यानंतर तब्बल पाच वर्षे उलटली. या पाच वर्षात प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्यांची प्राणज्योत मावळली तरी देखील तो फेरफार अर्ज अजूनही मंजूर झालेला नाही. तालुक्यातील कोथाळा येथे नागोराव गोरे यांची व त्यांचे इतर दोन मयत बंधू  कुंडलिक गोरे व संतराम गोरे यांच्यात सामायिकरित्या ५ हेक्टर ४४ आर शेतजमीन आहे. कुंडलिक गोरे व संतराम गोरे यांचे निधन झाल्यानंतर नागोराव गोरे हेच वारस असल्याने त्यांना कायदेशीररित्या वारस प्रमाणपत्र मिळाले. त्यानंतर त्यांनी तलाठी उज्ज्वल तंवर यांच्याकडे २३ ऑगस्ट २०१६ रोजी फेरफार अर्ज दाखल केला. तहसीलदार यांनी नागोराव गोरे यांच्या अधिकारात २ मे २०१७ रोजी कार्यालय आदेश काढून फेर घेण्याबाबत तलाठी यांना निर्देशित केले. तरी देखील तलाठी यांनी फेर घेतलाच नाही. कंटाळून नागोराव गोरे यांनी उपविभागीय अधिकारी, पाथरी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. यावर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी ३१ नोव्हेंबर २०१७ रोजी नागोराव गोरे यांच्या बाजूने आदेश पारित करुन तलाठी यांना फेर घेण्यास सांगितले. तरी देखील तलाठी उज्ज्वल तंवर व मंडळ अधिकारी योगेंद्र नांदापूरकर  यांनी वरिष्ठाच्या आदेशाचा अवमान करुन फेर घेतलाच नाही.  हे सर्व घडत असताना प्रशासकीय कार्यवाहीला कंटाळलेल्या नागोराव गोरे यांचा २० जुलै २०२० रोजी मृत्यू झाला. जिंवत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या आडकाठी धोरणामुळे या शेतकऱ्याचा फेर ओढला गेलाच नाही  नाही.  

टॅग्स :Farmerशेतकरी