शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्प तुडूंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:26 IST

जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील येलदरीसह ९ प्रकल्प १०० टक्के भरले असून सिद्धेश्वर धरणामध्ये ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये मात्र १३.३० टक्केच पाणीसाठा असल्याने या भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही चांगला पाऊस पडल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. या पाण्याने त्या खालील येलदरी धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरल्याचा अहवाल पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याशिवाय सिद्धेश्वर धरणात ९८.२० टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याबाहेरील औरंगाबादचा जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव येथील प्रकल्प ९९.७० टक्के भरला आहे. याशिवाय जिल्ह्यातील मासोळी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही १०० टक्के पाणी झाले आहे. पालम तालुक्यातील तांदुळवाडी व गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव, टाकळवाडी, कोद्री, जिंतूर तालुक्यातील बेलखेडा हे प्रकल्पही १०० टक्के भरले आहेत. याशिवाय जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पात ८४.२० टक्के, पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ८१.३० टक्के, पाथरी तालुक्यातील झरी प्रकल्पात ९२.५० टक्के, सोनपेठ तालुक्यातील नखतवाडी येथील प्रकल्पात ६६.८० टक्के, गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी तलावात ६०.१० टक्के, दगडवाडी तलावात ९३.८० टक्के, डोंगरपिंपळा तलावात ८४.७० टक्के, भेंडेवाडी तलावात ९८.३० टक्के, जिंतूर तालुक्यातील देवगाव तलावात ६४.७० टक्के, कवडा तलावात ७६.३० टक्के, मांडवी तलावात ६२.५० टक्के, चारठाणा तलावात ३९.६० टक्के, दहेगाव तलावात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे.८ प्रकल्पांचा पाणीसाठा चिंताजनक४दुधना नदीवरील निम्न दुधना प्रकल्पात फक्त १३.३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूरसह सेलू, परभणी, जिंतूर आदी तालुक्यातील या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांची चिंता वाढली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात फक्त ९.४ टक्के तर परभणी तालुक्यातील पेडगाव तलावात ७.७ टक्के, मानवत तालुक्यातील आंबेगाव तलावात २४.३ टक्के, जिंतूर तालुक्यातील जोगवाडा तलावात १९.६० टक्के, जिंतूर तालुक्यातील चिंचोली तलावात १९.३० टक्के, आडगाव तलावात १६.७० टक्के, केहाळ तलावात २२.४० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात या तलाव परिसरातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणी