शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी जनावरांची उपासमार; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा दौरा २०० जनावरांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 18:35 IST

Governor Bhagat Singh Koshyari's Parabhani visit : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत.

ठळक मुद्देवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रात शुक्रवारी सकाळपासूनच प्रवेश बंदीचारा मिळत नसल्याने पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिव्याख्यात्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

परभणी: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth) परिक्षेत्रात असलेले पशूवैद्यकीय महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चाऱ्याअभावी दोनशे जनावरांची उपासमार होत असल्याची तक्रार या महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ६ व ७ ऑगस्ट असे दोन दिवस परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे सर्व कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातच आहेत. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच या परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले असले तरी विद्यापीठाच्या परीक्षेत्रात असलेल्या पशूवैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र ओळखपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना या परिसरात प्रवेश करण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. परिणामी पशूवैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या २०० जनावरांना शुक्रवारी चारा मिळाला नाही. शनिवारीही दौऱ्यामुळे चारा मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दररोज या पशूवैद्यकीय महाविद्यालयात परिसरात विविध गावांमधील २०० पेक्षा अधिक जनावरे उपचारासाठी येतात. त्यांनाही प्रतिबंध करण्यात आल्याने त्यांचीही गैरसोय झाली आहे. 

या अनुषंगाने पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कण्डेय यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यात कृषी विद्यापीठ प्रशासनाने पशूवैद्यकीय महाविद्यालयास दुर्लक्षित केले. या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना पास देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे १०० कर्मचाऱ्यांना कामावर जात आले नाही. तसेच पशूवैद्यकीय दवाखान्यात असलेल्या २०० पेक्षा अधिक जनावरांना चारा मिळालेला नाही, असेही या तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अक्षम्य हालगर्जीपणामुळे या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली असून शेकडो जनावरांना वेळेवर उपचारही मिळत नसल्याचे तक्रार अर्जात मार्कण्डेय यांनी म्हटले आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडून खुलासा मागून घ्यावा, अशीही मागणी तक्रार अर्जात केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ