शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील रस्त्यांची झाली दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 23:46 IST

दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन वसाहतीत रस्त्यावर साचलेला चिखल आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन वसाहतीत रस्त्यावर साचलेला चिखल आणि प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.मागील सहा महिन्यांपासून शहरातील रस्ते अक्षरश: खड्डेमय झाले आहेत. प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हे खड्डे आणखीच मोठे झाले आहेत. देशमुख हॉटेल ते देशमुख गल्ली, सुपरमार्केट ते वसंतराव नाईक यांचा पुतळा, राजगोपालाचारी उद्यानाच्या पाठीमागील बाजूने नवा मोंढा पोलीस ठाण्यापर्यंतचा रस्ता, जामनाका ते दर्गा रोड, नगरपालिका कॉलनी परिसर, रायगड कॉर्नर ते जुना पेडगाव रोड, नानलपेठ ते नांदखेडारोड, गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून जागोजागी रस्ता उखडला असल्याने वाहनधारकांना वाहने चालविण्यासाठी कसरत करावी लागते. या शिवाय शहरातील नवीन वसाहतीमधील रस्त्यांची तर मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काळ्या मातीमुळे या रस्त्यांवर चिखल झाला असून नागरिकांना चिखलातून मार्ग काढीत घर गाठावे लागत आहे. कारेगाव रोड भागातील दत्तनगर, आशीर्वादनगर, विजयश्री नगर, समझोता कॉलनी, आनंदनगर, दत्तधाम परिसरातील सत्कार कॉलनी, आरोग्य कॉलनी, विक्रम सोसायटी या भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.संपूर्ण पावसाळ्यामध्ये या रस्त्यांवर चिखल साचला होता. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्यामुळे काही प्रमाणात त्रास कमी झाला होता; परंतु, दोन दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे. मुख्य रस्त्यांवरील खड्ड्याचे आकार वाढले आहेत. खड्डे चुकवत वाहनधारकांना वाहने चालवावी लागत आहेत. तर वसाहतीमधील रस्त्यांवरील चिखल तुडवत रस्ता पार करावा लागत आहे.मनपाने रस्त्यांची किमान डागडुजी करावी, मुरुम टाकून रस्ते तात्पुरत्या स्वरुपात का होईना; वाहतुकीयोग्य करुन वाहनधारकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस