शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण अत्यल्प; केवळ ११ टक्के नागरिकांचीच शोध घेऊन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 17:47 IST

महानगरपालिलकेच्या हद्दीत २ हजार ७९२ बाधित रुग्ण आढळले.

ठळक मुद्दे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वपूर्णकॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्ह्यात कमी कामगिरी झाल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे प्रमाण केवळ १०.८८ टक्के एवढीच आहे. त्यामुळे तपासण्यांची संख्याही मर्यादितच असल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. या काळात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या हाय रिस्क संपर्कातील नागरिक आणि लो रिस्क संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला देण्यात आले होते.जेणे करून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा उद्देश समोर ठेवण्यात आला. मात्र जिल्ह्यामध्ये हे प्रमाण कमी असल्याची बाब प्रशासनाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ७२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील ३७ हजार ९९७ आणि लो रिस्क संपर्कातील २८ हजार ७६ अशा एकूण ६६ हजार ७३ नागरिकांच्या तपासण्या प्रशासनाने केल्या आहेत. हे प्रमाण केवळ १०.८८ टक्के एवढे आहे. 

जिल्ह्याच्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात ३ हजार २८० बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील २२ हजार ९९८ आणि लो रिस्क संपर्कातील १८ हजार ३२५ अशा एकूण ४१ हजार ३२३ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. हे प्रमाण १२.६० एवढे आहे. एकंदर बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन तपासणीचे प्रमाण ११ आणि १२ टक्क्यांच्या आसपास असल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये जिल्ह्यात कमी कामगिरी झाल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट झाली. 

दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला आहे. या आकडेवारीवरून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या परभणी शहर आणि तालुक्यात अधिक आहे. मात्र असे असताना या तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण कमी राहिले. महानगरपालिलकेच्या हद्दीत २ हजार ७९२ बाधित रुग्ण आढळले. या रुग्णांच्या हाय रिस्क संपर्कातील १४ हजार ९९९ आणि लो रिस्क संपर्कातील ९ हजार ७५१ अशा २४ हजार ७५० नागरिकांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण ८.८६ टक्के एवढे आहे.

ग्रामीण भागात ३१४ रुग्ण आढळले असून, या रुग्णांच्या संपर्कातील १ हजार ५८२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण ५.०४ टक्के आहे. ग्रामीण भागातही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमीच आहे. जिल्ह्यात मानवत शहरात मात्र सर्वात कमी काम झाले आहे. मानवत शहरात २०८ रुग्ण आढळले. या रुग्णांच्या संपर्कातील केवळ ७०४ नागरिकांच्याच तपासण्या झाल्या आहेत. हे प्रमाण ३.५६ टक्के एवढे आहे. या तालुक्यात ग्रामीण भागात हे प्रमाण १६.४६ एवढे अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याparabhaniपरभणीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस