शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जन्मभूमीच्या नावाने स्वागत कमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 23:55 IST

पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : पाथरी हेच संत साईबाबा यांचे जन्मस्थळ असल्याचा दावा कायम ठेवत येथील नगरपालिकेने आता राष्टÑीय आणि राज्य महामार्गावर ‘साईबाबांची जन्मभूमी’ या नावाने पाच स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई जन्मभूमीच्या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर शिर्डीकरांनी विरोध सुरू केला. त्यामुळे पाथरीच्या जन्मभूमीची चर्चा आता देशपातळीवर सुरू झाली आहे. सध्या राज्यासह राज्याबाहेरील भाविकांचा पाथरीकडे ओढा वाढला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिर्डीवासीय शांत झाले असले तरी पाथरीकरांनी अजूनही साई जन्मभूमीचा दावा सोडला नाही. त्यातूनच पाथरी-आष्टी, पाथरी- सोनपेठ, पाथरी- सेलू, पाथरी- पोखर्णी या चार राज्य महामार्गावर आणि राष्टÑीय महामार्गावर स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून त्यासाठी ४० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली जाणार आहे.साई जन्मभूमीचा विषय देशपातळीवर गेला आहे. आमचा दावा कायम असून, नगरपालिकेकडून नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रमुख रस्त्यावर ‘साई जन्मभूमी पाथरीत साई भक्तांचे स्वागत’ अशा कमानी उभारल्या जाणार आहेत. पाच कमानींसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून खर्च केला जाणार असून, लवकरच हे काम हाती घेतले जाणार आहे.-आ.बाबाजानी दुर्राणीसाईबाबा यांची जन्मभूमी पाथरी असल्याने पाथरी नगरपालिकेने हा स्वागत कमानी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे.-हन्नानखान दुर्राणी, उपनगराध्यक्ष

टॅग्स :parabhaniपरभणीsaibabaसाईबाबाMuncipal Corporationनगर पालिका