शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : घरफोडीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:10 IST

येथील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि एका चोरी प्रकरणात तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि एका चोरी प्रकरणात तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील चंद्रकांत किशनराव रुद्रवार यांचे ट्रॅक्टरचे हेड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्याचप्रमाणे ओम कलेक्श्न हे कापड दुकान फोडून चोरीचा गुन्हा या पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ताडकळस पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी किशन ऊर्फ पप्पू गोविंदराव वईद (२३), निलेश ऊर्फ लल्लू नारायण जाधव (१९) आणि श्रीकृष्ण ऊर्फ शेंडी आश्रोबा बोबडे (सर्व रा.टाकळी बोबडे) यांना अटक केली. तिन्ही आरोपींनी वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.चोरलेले ट्रॅक्टर हेड आणि कापड दुकानातील कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस.एन. लहाने, हवालदार भारत तावरे, नाईक बाबासाहेब रोडे, माधव जंगम, धनंजय कनके यांनी केली. आरोपीस अटक करण्यासाठी सायबर सेलचे गणेश कौटकर यांचे सहकार्य लाभले.आठ मोटारसायकली जप्त४पोलिसांनी पकडलेल्या या तिन्ही आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यात पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल तसेच दैठणा, नवा मोंढा, नानलपेठ, वसमत, हट्टा, औंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून पोलिसांनी आठ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे वसमत येथे एक झेरॉक्स दुकान, हिंगोली येथे मोबाईल शॉपी, दोन पानपट्टी फोडल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी