शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

परभणी : तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:45 AM

एका ३५ वर्र्षींय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केल्याची घटना ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील उक्कलगाव शिवारात उघडकीस आली आहे. आशामती तुकाराम पिंपळे असे या मयत महिलेचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): एका ३५ वर्र्षींय महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केल्याची घटना ३० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तालुक्यातील उक्कलगाव शिवारात उघडकीस आली आहे. आशामती तुकाराम पिंपळे असे या मयत महिलेचे नाव आहे.उक्कलगाव येथील तुकाराम पिंपळे हे मुलाला शाळेत सोडविण्यासाठी बाहेर गावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नी आशामती पिंपळे या गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतात गेल्या. तुकाराम पिंपळे हे गावात परत आल्यानंतर सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास ते शेतात गेले. मात्र पत्नी शेतात आढळली नाही. त्यामुळे त्यांनी शेत शिवारामध्ये शोध घेतला असता शेताच्या कडेलाच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आशामती यांचा मृतदेह आढळला. त्यांचा गळा हत्याराने चिरलेला होता. तर शरीरावर पाच ते सहा ठिकाणी वार असल्याचे दिसून आले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे, सहाय्यक निरीक्षक शिवाजी पवार, जमादार शेख गौस, दीपक वाव्हळे, बालकिशन मगर, चाटे, परसोडे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचरण करण्यात आले. घटनास्थळावरील संशयित बोटांचे ठसे घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान, निर्घृंण खुनाच्या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून कोणी व का केला, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीMurderखून