परभणी: फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.६९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी उज्ज्वल कामगिरी करत आघाडी कायम राखली आहे.
जिल्ह्यातील एकूण २६ हजार ९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ५८४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यामधून २२ हजार ४३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६९ टक्के नोंदवले गेले आहे. काही विद्यार्थ्यांना अपयश आले असले तरी बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. गुणानुसार निकाल पाहता प्रथम श्रेणीत ६,६५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही संख्या लक्षणीय आहे. द्वितीय श्रेणीत १०,४८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर उत्तीर्ण श्रेणीत ३,१०१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यावरून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची एकूण गुणवत्ता दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल ९२.३८ टक्के लागला असून, मुलांचा निकाल ८३.८६ टक्के इतका आहे. त्यामुळे मुलींनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
शाखानिहाय निकालविज्ञान शाखेने यंदा सर्वाधिक निकाल नोंदवला आहे. या शाखेत १४,५८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे १३,७९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९५.५३ टक्के लागला असून, हा सर्वाधिक आहे. यामध्ये ६,४८२ मुली व ७,३१६ मुले उत्तीर्ण झाली आहेत.
कला शाखेत ९,४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६,८९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ७५.६२ टक्के लागला आहे. इतर शाखांच्या तुलनेत हा निकाल कमी असला तरी अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या शाखेत ३,३५८ मुली व ३,५४१ मुले उत्तीर्ण झाली आहेत.
वाणिज्य शाखेचा निकाल ८६.७० टक्के लागला आहे. या शाखेत १,८२७ विद्यार्थ्यांपैकी १,५५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये ७४१ मुली व ८११ मुले यांचा समावेश आहे. वाणिज्य शाखेनेही समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे. एकूण पाहता विज्ञान शाखेने आघाडी घेतली असून, कला शाखेत निकाल तुलनेने कमी असला तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा दिसून येत आहे.
तालुकानिहाय निकालजिंतूर : ९३.११%पाथरी : ९१.२५%पालम : ९०.२२%गंगाखेड : ८८.४३%सोनपेठ : ८८.३९%परभणी : ८६.७६%मानवत : ८६.४७%सेलू : ८४.३६%पूर्णा : ७८.२६%
तीन तालुके ९० टक्क्यांच्या पुढेजिल्ह्याने यंदाही समाधानकारक कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून निकालात सातत्याने सुधारणा होत असल्याचे चित्र असून, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. यंदा जिंतूर, पाथरी आणि पालम तालुक्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल नोंदवत आघाडी घेतली आहे. तर पूर्णा तालुक्याचा निकाल तुलनेने कमी लागला आहे.
गुणानुसार निकाल :प्रथम श्रेणी : ६,६५६ विद्यार्थीद्वितीय श्रेणी : १०,४८२ विद्यार्थीउत्तीर्ण श्रेणी : ३,१०१ विद्यार्थी
३.१६ टक्क्यांनी वाढला बारावीचा निकालफेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा निकालात ३.१६ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा एकूण निकाल ८७.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यावेळी जिल्ह्याचा निकाल ८४.५३ टक्के लागला होता. यामध्ये मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९२.१० टक्के, तर मुलांचे ८१.७२ टक्के होते. यंदा मात्र निकालात सुधारणा होत मुलींचे उत्तीर्ण प्रमाण ९२.६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर मुलांचे प्रमाण ८३.८६ टक्के इतके नोंदवले गेले आहे.
Web Summary : Parbhani district's HSC result is 87.69%, with girls outperforming boys. Science stream excelled at 95.53%. Jintur tops taluka results at 93.11%.
Web Summary : परभणी जिले का एचएससी परिणाम 87.69% रहा, जिसमें लड़कियों ने लड़कों को पछाड़ा। विज्ञान संकाय 95.53% के साथ शीर्ष पर रहा। जिंतूर तालुका 93.11% के साथ अव्वल रहा।