शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: गंगाखेडमधून विद्यार्थ्यांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:23 IST

शहरातील डॉक्टरलेन भागातील खाजगी वसतिगृहातील दोन शाळकरी मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातील डॉक्टरलेन भागातील खाजगी वसतिगृहातील दोन शाळकरी मुलांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली़ या प्रकरणी शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़गंगाखेड शहरातील डॉक्टरलेन परिसरात असलेल्या खाजगी वसतिगृहातील समाधान भास्कर ठवरे (१५, रा़ आनंदवाडी ता़ पालम) व जनार्धन शिवाजी साबळे (१५, रा़ धनेवाडी ता़ पालम) हे दोघे २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७़२५ वाजता शाळेत जाण्यासाठी वसतिगृहातील रजिस्टरला नोंद करून बाहेर गेले़ शाळा सुटल्यानंतर दुपारी २ वाजता ते वसतिगृहात परत आले नसल्याने व्यवस्थापक विजेश सूर्यकांत बाबर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या शाळेत तसेच त्यांच्या पालकांना फोन करून मुले गावाकडे आले आहेत का? याबाबत विचारणा केली़ मात्र दोन्ही मुले गावाकडे आले नाहीत, असे पालकांनी सांगितल्याने मुलांच्या नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला; परंतु, दोन्ही मुले मिळून आली नसल्याने वसतिगृहाचे व्यवस्थापक विजेश बाबर यांनी २२ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात कारणावरून दोन्ही मुलांना पळून नेल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे हे तपास करीत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी