शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: कारवरील ताबा सुटल्याने धडकेत ४ मित्रांचा जागीच मृत्यू; अपघातानंतर चालक पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:13 IST

उज्जैन दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा अपघाती मृत्यू ; जिंतूर तालुक्यातील अकोली पुलावरील घटना

जिंतूर (जि. परभणी): देवदर्शनासाठी उज्जैनकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा परभणी - जिंतूर मार्गावरील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे गंगाखेड, जिंतूर परिसरात शोककळा पसरली आहे.

बालाजी आश्रोबा औटी (२८, रा. खडकपुरा), बालाप्रसाद उत्तमराव घोरपडे (३०, रा. तारुमोहल्ला) कृष्णा बालाजी गुट्टे (२८, रा. कोद्री रोड), रोहन संजय राठोर (२७, रा. लक्ष्मीनगर) अशी मयतांची नावे आहेत. तर गोपाळ गणेश रोकडे (२८, रा. खडकपुरा) गंभीर जखमी झाला आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील पाच भाविक कार (क्र. एमएच १४ केएफ २७९०) गंगाखेडहून जिंतूरमार्गे उज्जैन येथे देवदर्शनासाठी जात होते. जिंतूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील अकोली पुलाजवळ येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मोठा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. घुगे व चालक पवार यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मुद्दसीर व रुग्णकक्ष सेवक गंगाधर पालवे यांनी तपासणी केल्यानंतर बालाजी औटी, बालाप्रसाद घोरपडे, कृष्णा गुट्टे, रोहन राठोर या चौघांना मृत घोषित केले, तर गोपाळ रोकडे गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ऐन तारुण्यात चार जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गंगाखेड शहरात शोककळा पसरली आहे.

चालक घटनास्थळावरून पसार
अपघात घडताच वाहनचालक अभिजित शिंगाडे (रा. धनगरमोहा, ता. गंगाखेड) हा घटनास्थळावरून पसार झाला. बीट जमादार दत्तात्रय गुंगाणे यांच्या फिर्यादीवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि विजय जाधव करीत आहेत.

अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, बीट जमादार दत्तात्रेय गुंगाणे, मेजर थोरवे व पोलिस वाहनचालक पैठणे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी घटनास्थळी व रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Car accident kills four friends; driver flees scene.

Web Summary : Four friends died and one was injured in a car accident near Akoli bridge in Parbhani district. The driver lost control of the vehicle. The driver fled the scene; police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी