अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:17 IST2021-02-12T04:17:09+5:302021-02-12T04:17:09+5:30

या अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. मीराताई सुपेकर, १३ रोजी पुष्पाताई पवार, १४ रोजी पुष्पाताई पुंड, १५ रोजी अर्चना ...

Organizing Akhand Harinam Week | अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

या अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. मीराताई सुपेकर, १३ रोजी पुष्पाताई पवार, १४ रोजी पुष्पाताई पुंड, १५ रोजी अर्चना पोले, १६ रोजी शीलाताई निकम, १७ रोजी विवेक महाराज बागल, १८ रोजी सिद्धराम जाधव आणि १९ फेब्रुवारी रोजी बाळासाहेब मोहिते पाटील यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

पुरस्कार समारंभ

परभणी : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती एका प्रसिद्धी पत्रकान्वये वारकरी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

परभणी येथे माता रमाई जयंती

परभणी : शहरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर भागात त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सभापती गुलमीर खान, नंदा राठोड, आर.आर. रोडे, मुमताज शेख यांची उपस्थिती होती. यावेळी यशवंत मकरंद यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा औटे यांनी तर आभार आशाताई कांबळे यांनी मानले.

Web Title: Organizing Akhand Harinam Week