शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

निम्न दुधनाच्या कालव्याचे काम नव्याने करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 3:25 PM

निकृष्ट कामाचा परिणाम

ठळक मुद्देआदेशानंतरही कामाला होईना सुरुवातमुख्य कालव्यालाच जागोजागी तडे

- मारोती जुंबडे परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम कुंभारी बाजार परिसरात निकृष्ट दर्जाचे झाले असून, आता हे काम नव्याने करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे़ या आदेशामुळे निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले असून, या प्रकरणात कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घातले जात असल्याचा आरोप लाभधारक शेतकरी करीत आहेत़ 

निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मुख्य कालवे, चाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली़ परंतु, प्रत्यक्षात हे काम योग्य दर्जाचे होत नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होत आहे़ निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार या गावापर्यंत पूर्ण झाले आहे़  मात्र, काही महिन्यांतच कालव्याला जागोजागी तडे गेले आहेत़ काम निकृष्ट झाल्याचे अभियंत्यांच्याच लक्षात आले़ कालव्याला सिमेंट काँक्रीटीकरण करताना ४ इंच जाडीचा थर देणे अपेक्षित असताना केवळ २ इंचाचा थर दिला. त्यामुळे काही भागाचे काम नव्याने करण्याचे आदेश दिले आहे.

मुख्य कालव्यालाच जागोजागी तडेच्निम्न दुधना प्रकल्पाच्या मुख्य कालव्यालाच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत़ कालव्याच्या बाजूने जाणाऱ्या पक्क्या रस्त्यावर मुरमाचा भराव टाकला नाही़ परिणामी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे सिमेंट काँक्रीटचे थर चक्क उखडून गेले आहेत़ विशेष म्हणजे, हे काम पूर्ण होऊन साधारणत: दोन-तीन महिन्यांचाच कालावधी लोटला आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीDamधरण