कुऱ्हाडीच्या दांड्याने एकाचे डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:13 IST2021-07-04T04:13:33+5:302021-07-04T04:13:33+5:30

पाथरी येथील सुभाष सेटिबा कुऱ्हाडे हे २ जुलै रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास वडार वस्तीतील रस्त्याने जात असताना, याच ...

One of the axes smashed his head | कुऱ्हाडीच्या दांड्याने एकाचे डोके फोडले

कुऱ्हाडीच्या दांड्याने एकाचे डोके फोडले

पाथरी येथील सुभाष सेटिबा कुऱ्हाडे हे २ जुलै रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास वडार वस्तीतील रस्त्याने जात असताना, याच भागातील उत्तम पांडुरंग शिंदे हा तेथे आला. त्याने कुऱ्हाडे यांना गोपेगाव येथील ट्रॅक्टर मालक राहुल गिराम यांना माझ्याबद्दल काय सांगितले, असा प्रश्न विचारला. यावेळी कुऱ्हाडे यांनी आपण गिराम यांना काहीही सांगितले नाही, असे सांगताच शिवीगाळ करीत थापडबुक्क्याने मारहाण केली तसेच हातातील कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात कुऱ्हाडे यांना गंभीर दुखापत झाली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. याबाबत सुभाष कुऱ्हाडे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी उत्तम पाडुरंग शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: One of the axes smashed his head