जमीन नावावर करूनही नोकरी दिली नाही; संस्थाचालकाच्या फसवणुकीने तरुणाची शाळेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 07:31 PM2021-09-16T19:31:24+5:302021-09-16T19:39:33+5:30

तरुणाला आणि त्याच्या पत्नीला शाळेत नोकरीवर लावण्याचे दिले आमिष

Not even given a job in the name of land; Young man commits suicide at school | जमीन नावावर करूनही नोकरी दिली नाही; संस्थाचालकाच्या फसवणुकीने तरुणाची शाळेत आत्महत्या

जमीन नावावर करूनही नोकरी दिली नाही; संस्थाचालकाच्या फसवणुकीने तरुणाची शाळेत आत्महत्या

Next
ठळक मुद्देस्वतःची जमीन दिली संस्थेच्या शाळेसाठी 2006 पासून केली फसवणूक

पालम (परभणी ) : संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने शाळेतच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना पालम तालुक्यातील शेखराजूर येथील अंध व निवासी मूकबधिर शाळेत आज सकाळी उघडकीस आली. मृताच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली असून या प्रकरणी संस्थाचालकाविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण ऊर्फ लक्ष्मण किसनराव पवार ( 37) असे मृताचे नाव आहे. नांदेड येथील संस्थाचालक विठ्ठल संभाजी गुट्टे यांची शेखराजूर येथे अंध व मूकबधिर शाळा आहे. त्यावर नारायण पवार यांना सेवक व त्यांची पत्नी स्वाती पवार ( 32) यांना स्वयंपाकी म्हणून नोकरीवर घेण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात पवार यांनी स्वतःची दीड एकर जमीन शाळेसाठी दान दिली. यानंतरही ठरल्याप्रमाणे गुट्टे यांनी पवार दांपत्यास नोकरी दिली नाही. दरम्यान, त्याची तक्रार करूनही न्याय मिळाला नाही. म्हणून पवार दडपणाखाली वावरत होते. याच विवंचनेत असताना आज सकाळी पवार यांनी शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयताची पत्नी स्वाती पवार यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक विठ्ठल गुट्टे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.

हेही वाचा - विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

सुसाईड नोट मधील मजकूर
मयत पवार यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात "मी नारायण पवार आत्महत्या करीत आहे. कारण विठ्ठल संभाजी गुट्टे, या संस्थाचालकाने मला नोकरीला लावतो, असे म्हणून 2006 मध्ये माझी दीड एकर जमीन घेतली आणि मला नोकरीला लावले नाही. माझ्यावर उपासमारीची वेळ आणली, माझी जमीन शासनाने परत मिळवून द्यावी, ही माझी शेवटची विनंती", या आशयाचा मजकूर आढळला आहे.

हेही वाचा - हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला

Web Title: Not even given a job in the name of land; Young man commits suicide at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app