विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 03:48 PM2021-09-16T15:48:17+5:302021-09-16T16:01:06+5:30

Ragging of a girl student in Nanded : विद्यार्थिनीचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा दाखला काढून घेतला.

Ragging of a girl student by undressing; Crime against a nursing college teacher, three female students | विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

विवस्त्र करून विद्यार्थिनीचे रॅगिंग; नर्सिंग कॉलेजच्या शिक्षक, तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देमुलीने घडलेला प्रकार वडिलांना कळवला.नंतर पोलीस ठाणे गाठून मुलीने तक्रार दिली.

हदगाव / बामणी फाटा (जि. नांदेड) : ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार...’ असे म्हणून एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास भाग पाडून रॅगिंग करण्याची घटना हदगावपासून एक किलोमीटर अंतरावरील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजच्या वसतिगृहात रविवारी घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एका शिक्षकासह तीन विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, शिक्षकाला अटक केली आहे. ( Ragging of a girl student by undressing; Crime against a nursing college teacher, three female students ) 

पीडित मुलगी आठच दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये दाखल झाली. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. वरिष्ठ वर्गात असलेल्या तीन मुली मंगळवारी पीडितेच्या खोलीत गेल्या व त्यांनी पीडितेला ‘आम्ही सिनियर आहोत’, असे धमकावले. तसेच ‘कपडे काढ, नाक घास, झाडू मार... असे म्हणून तिला तसे करण्यास भाग पाडले. हे सांगण्यासाठी मुलगी शिक्षक भगीरथ शिंदे याच्याकडे गेली, तेव्हा त्यानेही तिचा विनयभंग करून, ‘तू हलक्या जातीची आहेस, तुझे शैक्षणिक नुकसान करतो’, असे म्हणून तिला धमकावल्याचा आरोप आहे. मुलीने घडलेला प्रकार वडिलांना कळवला. सकाळी तिचे वडील महाविद्यालयात आले आणि त्यांनी तिचा दाखला काढून घेतला. नंतर पोलीस ठाणे गाठून मुलीने मंगळवारी तक्रार दिली. पोलिसांनी भगीरथसह त्या तीन मुलींविरुद्ध गुन्हा नोंदवला व भगीरथला अटक केली. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड तपास करीत आहेत. उपविभागीय अधिकारी जी. जी. रांजणकर तपास करीत आहेत.

हेही वाचा - दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले

इतर विद्यार्थिनींच्या पोलीस ठाण्यात चकरा
ही घटना कळताच बुधवारी सकाळी काही विद्यार्थिनींनी आरोपी मुलींची बाजू घेऊन पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात सरांचा दोष नाही, त्यांना सोडा, अशीही मागणी मुलींनी केली. मात्र, पोलीस निरीक्षक गायकवाड, महिला फौजदार कदम यांनी मुलींची समजूत काढली. तुम्ही निवेदन द्या. तपासात सत्य समोर येईलच, असे त्यांनी सांगितले. दुपारी कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा काही विद्यार्थिनी ठाण्यात गेल्या. मात्र, उपविभागीय अधिकारी जी. जी. रांजणकर यांनी आरोपींवरील कारवाई थांबविण्यास नकार देऊन या मुलींना परत पाठवले.

हेही वाचा - मराठवाड्याला १३९ मि.मी.अतिरिक्त पावसाचा तडाखा; १५ लाख हेक्टरवरील पिके चिखलात

कॉलेजमध्ये तसा प्रकार झाला नाही. गेल्या दहा वर्षापासून मी येथे कार्यरत आहे. पोलीस तपासामध्ये सत्य बाहेर येईल 
- एच.वाय. शिंदे, प्राचार्य.

नर्सिंग कॉलेजमध्ये गणपती बसविण्यात आला. त्या ठिकाणी मुलं-मुली डीजे लावून नृत्य करतात. मी या प्रकाराला विरोध केला. आम्ही मुलींना शिकविण्यासाठी कॉलेजला पाठवितो. नृत्य शिकायला नाही. माझ्या मुलीला रॅगिंगचा सामना करावा लागला म्हणून मी तिची टीसी काढली. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
- पीडित मुलीचे पालक
 

Web Title: Ragging of a girl student by undressing; Crime against a nursing college teacher, three female students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.