सोशल मीडियावर प्रेयसीचे फोटो व्हायरल करणाऱ्या प्रियकराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 07:19 PM2021-05-13T19:19:55+5:302021-05-13T19:20:13+5:30

crime News in Parabhani : डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याला लाठ्या- काठया व दगडाने मारहाण केली.

Murder of a boyfriend who made a photo of his girlfriend viral on social media | सोशल मीडियावर प्रेयसीचे फोटो व्हायरल करणाऱ्या प्रियकराचा खून

सोशल मीडियावर प्रेयसीचे फोटो व्हायरल करणाऱ्या प्रियकराचा खून

Next

देवगांवफाटा ( परभणी ) : सेलू तालुक्यातील खैरी येथील एका विवाहित महिलेसोबत दोन वर्षे प्रेम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील तरुणाने सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकल्याचा राग मनात धरून विवाहितेच्या नातेवाईकांनी या तरुणाचा खून केल्याची घटना सेलू तालुक्यातील खैरी येथे १२ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात ३ आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सेलू तालुक्यातील खैरी येथील एका महिलेचा विवाह झाल्यानंतर ही महिला सासरी जात नव्हती. ती खैरी येथे माहेरी राहत होती. मागील काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील पिंपळवाडी येथील संतोष डिघोळे याच्याशी या महिलेचे अनैतिक संबंध होते. दोघांचे एकमेकांसोबत काही काळ चांगले जुळलेही होते; परंतु काही दिवसांपासून त्यांच्यात भांडण होत असे. त्यातच संतोष डिघोळे या प्रियकराने महिलेसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्यास सुरुवात केली. याचा राग अनावर झाल्यामुळे या महिलेने प्रियकर संतोष डिघोळे यास १२ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास खैरी येथे बोलावून घेतले. त्यानंतर रात्री ९ च्या सुमारास आरोपी महिला व तिचे वडील उद्धव घुगे, भाऊ रंगनाथ घुगे यांनी संतोष डिघोळे याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याला लाठ्या- काठया व दगडाने मारहाण केली. यात संतोष डिघोळे याचा जागेवरच मृत्यू झाला.

चारठाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप अलापूरकर, कर्मचारी पवन राऊत, जानगर, बळीराम इघारे, दत्तात्रय भानुसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस पाटील हनुमंत दादाराव घुगे यांच्या फिर्यादीवरून ३ आरोपींविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांनी भेट दिली असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक बळवंत जमादार करीत आहेत.

Web Title: Murder of a boyfriend who made a photo of his girlfriend viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.