शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

जिंतूर आणि सेलूतील जलसंधारणच्या ३९ कामांत अनियमितता; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:56 IST

बहुतांश कामे कागदोपत्रीच करण्यात आली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण विभागाकडे करण्यात आली होती.

ठळक मुद्देजिंतूर, सेलू तालुक्यातील प्रकार 

- ज्ञानेश्वर रोकडे

जिंतूर (जि. परभणी) : जालना येथील मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयामार्फत जिंतूर व सेलू तालुक्यात २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या ३९ कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली असून, याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस परभणी येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा चौकशी अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. 

जिंतूर व सेलू तालुक्यात जालना येथील  मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१८-१९ या वर्षात ४३ कोटी ४१ लाख ४६ हजारांची आडगाव, असोला, इटोली, चिकलठाणा, पाचेगाव, साईनगर, मांडववाडी, रवळगाव, बोथ, चिकलठाणा, गिरगाव बु., मांडववाडी, कवडधन, नवहाती, हनवतखेडा, कोठा, सावरगाव, पिंप्री, बोरकिनी या गावांमध्ये ३९ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. सदरील कामे पूर्ण झाल्याचे अहवालही तयार झाले; परंतु यातील बहुतांश कामे कागदोपत्रीच करण्यात आली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परभणी येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कच्छवा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

कच्छवा यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. त्यानुसार जिंतूर तालुक्यातील आडगाव येथे जून २०१९ मध्ये ५ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये अगोदरच एक कोल्हापुरी बंधारा व ९ सिमेंट बंधाऱ्यांची कामे केलेली असताना व तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जागाही उपलब्ध नसताना ९० टक्के काम पूर्ण  झाल्याचे जलसंधारण अधिकाऱ्यांनी प्रमाणित केले. येथील कामाच्या मोजमाप पुस्तिकेमध्ये खाडाखोड करण्यात आली. २ लाख २५ हजार ७११ घनमीटर काम केल्याची कागदोपत्री नोंद झाली. 

९० टक्के कामे झाल्याचा अहवाल शासनाला प्रत्यक्षात १० हजार घनमीटरही काम झाले नाही. असोला येथे २९ जून २०१९ रोजी मंजुरी मिळालेल्या बंधारा क्रमांक ५ व ६ चे थातूरमातूर काम केले व ७८ टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिला. याच गाव शिवारात यापूर्वी ११ सिमेंट बंधारे व ४ कोल्हापुरी बंधारे असताना दोन्ही बंधाऱ्यांचे काम केले असल्याचे सांगितले. तालुक्यात ३९ ठिकाणची कामे झाली नसताना जवळपास ती ९० टक्के झाल्याचा अहवाल शासनाला दिला आहे. 

टॅग्स :Waterपाणीparabhaniपरभणी