शहरात वाढला धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST2021-01-23T04:17:47+5:302021-01-23T04:17:47+5:30

चारही बाजूंचे रस्ते उखडल्याने तारांबळ परभणी : शहरात येण्यासाठी चारही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी ...

Increased dust in the city | शहरात वाढला धुळीचा त्रास

शहरात वाढला धुळीचा त्रास

चारही बाजूंचे रस्ते उखडल्याने तारांबळ

परभणी : शहरात येण्यासाठी चारही बाजूंच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्ता निर्मितीच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. परभणी- गंगाखेड, परभणी- जिंतूर, परभणी- वसमत आणि परभणी- पाथरी या चारही मार्गांवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करून वाहतूक योग्य रस्ते निर्माण करावेत, अशी मागणी होत आहे.

विजेच्या लपंडावाने शेतकरी त्रस्त

परभणी : ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत असून या पिकांना पाणी देणे गरजेचे असताना वीजपुरवठा गायब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. महावितरण कंपनीने ग्रामीण भागाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Increased dust in the city