क्रांतिवीर भाई विठ्ठल कोतवाल व हिराजी पाटील यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST2021-01-04T04:14:49+5:302021-01-04T04:14:49+5:30

नाभिक समाजबांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून ...

Greetings to Krantiveer Bhai Vitthal Kotwal and Hiraji Patil | क्रांतिवीर भाई विठ्ठल कोतवाल व हिराजी पाटील यांना अभिवादन

क्रांतिवीर भाई विठ्ठल कोतवाल व हिराजी पाटील यांना अभिवादन

नाभिक समाजबांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटे स्तब्धता पाळून क्रांतिवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना आदरांजली वाहत पाच तोफांची सलामी देण्यात आली. संयोजक बालासाहेब पारवे यांनी क्रांतिवीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या क्रांती लढ्याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती देत अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना तालुका प्रमुख अनिल सातपुते, छोटू जब्दे, गोविंद रोडे, संजय कातकडे, प्रशांत फड आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल नेजे, पांडुरंग नेजे, पांडुरंग पैलवान, दीपक पारवे, ऊमेश नेजे, अशोक सुर्वे, दता सूर्यवंशी, बबन नेजे, देवीदास नेजे, नकुल डमरे, नारायण डमरे, शिवाजी गळाकटु, अंकुश डमरे, शंकर डमरे, बालासाहेब नेजे, पिंटू डमरे, शिवाजी डमरे, विष्णू नेजे, बंडू डमरे, शिवाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी नाभिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Greetings to Krantiveer Bhai Vitthal Kotwal and Hiraji Patil