शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस; रबी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 19:51 IST

रबीच्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ 

ठळक मुद्देवीज पुरवठाही खंडीतवादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

परभणी : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारी रात्री जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली़ यामुळे रबीच्या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ 

परभणी शहर व परिसरात सोमवारी रात्री ८ च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली़ जवळपास १० ते १५ मिनिटे पाऊस झाल्यानंतर हा पाऊस बंद झाला़ त्यानंतर रात्री ११ वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली़ रात्री जवळपास अडीच वाजेपर्यंत अधूनमधून वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता़ मध्यरात्री जवळपास ४ च्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला़ वीज पुरवठा बंद झाल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़ याशिवाय वादळी वाºयामुळे शहरातील विविध भागांमधील झाडे तुटून पडली होती़ तसेच कोरोनाच्या अनुषंगाने जनजागृती संदर्भात लावण्यात आलेले शहरातील विविध भागांतील फलकही कोसळले़ महसूल विभागाकडे शहरात सोमवारी रात्री १२  मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे़ या शिवाय परभणी ग्रामीण महसूल मंडळात ११, सिंगणापूरमध्ये २७, दैठण्यात १०, झरीत १२, पेडगावमध्ये १०़६०, पिंगळीत १३ व जांबमध्ये १४ मिमी पाऊस झाला आहे़ पुर्णेत १७ मिमी पाऊसपूर्णा : पूर्णा शहर व तालुक्यात सोमवारी रात्री ५ महसूल मंडळांत तब्बल १६़८० मिमी पाऊस झाला़ वादळी वारे व पावसामुळे आंब्याच्या कैºया गळून पडल्या़ तसेच गहू, ज्वारी, हळद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तालुक्यातील पूर्णा महसूल मंडळात २२, ताडकळस महसूल मंडळात २४ तर चुडावा, कात्नेश्वर महसूल मंडळात प्रत्येकी १२, लिमला मंडळात १४ असा एकूण  सरासरी १६़८० मिमी पाऊस झाला़ परभणी जिल्ह्यात ८ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सरासरी ८़४ मिमी पावसाची नोंद झाली़ त्यामध्ये परभणी तालुक्यात १३़७० मिमी, पालम तालुक्यात ०़३३ मिमी,  पूर्णा तालुक्यात १६़८० मिमी, गंगाखेड तालुक्यात ५़५० मिमी, सोनपेठ तालुक्यात ११़५० मिमी, सेलू तालुक्यात ५़२० मिमी, पाथरी तालुक्यात ५ मिमी, जिंतूर तालुक्यात ५़६७ मिमी, मानवत तालुक्यात १०़६७ मिमी पाऊस झाला़

टॅग्स :RainपाऊसparabhaniपरभणीFarmerशेतकरी