शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आधी बियाणांचा धोका, नंतर निसर्गाचा कोप; शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 13:59 IST

सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव शिवारात पालकमंत्री नवाब मलिक यांनी पाहणी केली. 

ठळक मुद्देवेळ प्रसंगी कर्ज काढून मदत करूदिवाळी पूर्वी मदत केली जाईल

सेलू : अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची झालेल्या नुकसानीची  सेलू तालुक्यातील वाकी आणि ढेंगळी पिंपळगाव शिवारात  पाहणी  करण्यासाठी शेतक-यांच्या बांधावर आलेल्या पालकमंञी नवाब मलिक यांच्या समोर व्यथा मांडून तातडीने मदतची मागणी केली. दोन दिवसात मंञी मंडळाच्या बैठकीत मदतीचा निर्णय घेऊन दिवाळी पूर्वी शेतक-यांना मदत करणार असल्याचे आश्वासन मलिक यांनी दिले. 

शुक्रवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री नवाब मलिक यांनी वाकी शिवारातील प्रल्हाद हुंबे यांच्या ७ एकर शेतातील अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण शेतात पाणी साचले आहे. या शेताची पाहणी करून नवाब मलिक यांनी परभणी रस्त्यावरील ढेंगळी पिंपळगाव शिवारातील शिवाजी कोरडे, साहेबराव कोरडे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतक-यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पीक कर्ज मिळत नसून दलालामार्फत कर्ज मंजूर केली जात आहेत. शेकडो शेतक-यांची पीक कर्ज प्रस्ताव अनेक महिन्यांपासून  प्रलंबित असल्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर उपविभागीय अधिकारी उमाकांत, तहसीलदार बालाजी शेवाळे, जिपचे सदस्य अशोक काकडे, पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर,  मिलिंद सावंत आदी उपस्थित होते. 

अन शेतक-याला रडू कोसळलेसोयबीनचे बियाणे उगवले नसल्याने शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. कापणीच्या वेळीच अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन भिजून कोंब फुटले,  कापसाचा झाडा झाला. आता हाती काहीच उरले नाही. तसेच अमृत सोंळके सह चार  शेतक-यांची दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात जमीन संपादित केली आहे. पंरतु अद्यापही वाढीव मोबदला मिळाला हे सांगताना शेतकरी सोंळके यांना रडू कोसळले. 

वेळ प्रसंगी कर्ज काढून मदत करूअतिवृष्टी व पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतक-यांना मदत करण्यासाठी कमी पडणार नाही. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीचा अद्यापही राज्याला परतावा मिळाला नाही. आपत्ती व्यवस्थापनातून केंद्रानेही राज्य सरकारला मदत करण्याची गरज आहे. शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी वेळ प्रसंगी कर्ज काढून दिवाळी पूर्वी मदत केली जाईल असे पालकमंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीnawab malikनवाब मलिकRainपाऊस