जिल्ह्याला प्राप्त झाली ३४ हजार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:18 IST2021-05-06T04:18:39+5:302021-05-06T04:18:39+5:30

कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस राज्य शासनाकडून प्राप्त झाले असून, १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच अपॉइंटमेंट घेऊन ...

The district received 34 thousand vaccines | जिल्ह्याला प्राप्त झाली ३४ हजार लस

जिल्ह्याला प्राप्त झाली ३४ हजार लस

कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस राज्य शासनाकडून प्राप्त झाले असून, १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच अपॉइंटमेंट घेऊन लसीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कोव्हॅशिल्डचे २२ हजार डोस केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या लसीचा वापर प्राधान्याने दुसरा डोस घेणाऱ्या ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांसाठी केला जाणार आहे. लाभार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयात या लसीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.

मनपाच्या सहा केंद्रांवर सत्र

शहरातील शंकरनगर व साखला प्लॉट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ४५ वर्षांत पुढील नागरिकांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. या ठिकाणी पहिल्या डोससाठी नागरिकांनी उपस्थित राहू नये. त्याचप्रमाणे मनपाच्या जायकवाडी, इनायतनगर, खानापूर व खंडोबा बाजार येथील आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस दिला जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त देविदास पवार यांनी दिली.

Web Title: The district received 34 thousand vaccines