शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात प्रवेश मिळविण्यासाठी वडिलांच्या निधनाची बतावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:31 IST

जिल्ह्यात प्रवेश मिळावा, यासाठी चक्क वडिलांच्या निधनाची बतावणी केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघड झाला असून, पुण्याहून आलेल्या तिघांविरुद्ध राष्टÑीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): जिल्ह्यात प्रवेश मिळावा, यासाठी चक्क वडिलांच्या निधनाची बतावणी केल्याचा प्रकार पोलिसांच्या चौकशीत उघड झाला असून, पुण्याहून आलेल्या तिघांविरुद्ध राष्टÑीय आपत्ती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील शिर्शी येथील मूळचे रहिवासी असलेले आकाश वैजनाथ रणदिवे, वैजनाथ इंद्रूबा रणदिवे आणि रेखा वैजनाथ रणदिवे हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे वास्तव्याला होते. संचारबंदीमुळे तिघेही चाकण येथेच अडकले. गावाकडे परतण्यासाठी हे तिघेही पुणे येथून एमएच-१२ एनएक्स- २९३१ या कारने सोनपेठ तालुक्याकडे निघाले. १३ एप्रिल रोजी तालुक्यातील डिघोळ येथील चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांची गाडी अडविली. त्यांच्याकडे चौकशी केली असता वडिलांचे निधन झाल्याने गावाकडे जात असल्याचे वैजनाथ यांनी पोलिसांना सांगितले.या माहितीवरुन पोलिसांनी शिर्शी येथे फोन करुन खातरजमा केली असता त्यांच्या वडिलांचे निधन तीस वर्षापूर्वीच झाले असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांना खोटी माहिती देवून जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न फसला आहे. विशेष म्हणजे या तिघांनी तोंडाला रुमाल अथवा मास्कही लावला नव्हता. या सर्व प्रकारानंतर पोलीस नाईक मनिष कौठाळे यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तिघांचीही ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.जिल्ह्यात सीमाबंदी असल्याने वेगवेगळी कारणे सांगून जिल्ह्यात प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वी रुग्णवाहिकेतून परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश केला जात असल्याचा प्रकारही पोलिसांनी उघडकीस आणला होता.

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस