शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

१,६२० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:16 IST

मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस व रब्बी हंगामात वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन्ही हंगामातील पिकांमधून उत्पन्न हाती ...

मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस व रब्बी हंगामात वादळी वारे व पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन्ही हंगामातील पिकांमधून उत्पन्न हाती लागले नाही. त्याचबरोबर मागील वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे शेती संलग्न असणारे व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यातच खरीप हंगामाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली आहे. या खरीप हंगामातील पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या बी-बियाणे, खते व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात उसनवारी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पीक कर्जाकडे लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १,६२० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत जवळपास ४ हजार शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचे वाटप बँकांनी केले आहे. त्यामुळे यावर्षी सर्व बाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेत व पेरणीपूर्वी बँकांनी पीक कर्ज वाटप करून वेळेत पैसा उपलब्ध करून दिला तर शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी सोयीचे होणार आहे.

दोन ते तीन वर्षापासून उद्दिष्ट होईना पूर्ण

जिल्हा प्रशासनाने बँकांना खरीप हंगामात दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट मागील दोन ते तीन वर्षांपासून बँकांकडून पूर्ण करण्यात येत नाही. कधी ६० टक्के तर कधी ५० टक्‍क्‍यांवर पीक कर्ज वाटप थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारासह उसनवारी करून आपली पेरणी पूर्ण करावी लागली. त्यामुळे चाेहोबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान यावर्षी तरी बँकांकडून वाटप करण्यात येणाऱ्या पीक कर्जाचा सहारा मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.