शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

coronavirus : परभणीत मयत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह ; जिल्ह्याची रुग्णसंख्या २२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:18 AM

मुंबईतील वाशी भागातून जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे मूळ गावी आलेली महिला २० मे ला मृत झाली होती

परभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथील महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरील गाव शनिवारी सकाळी सील केले आहे. 

 मुंबईतील वाशी भागातून जिंतूर तालुक्यातील सावंगी भांबळे येथे मूळ गावी आलेली एक ५२ वर्षीय कोरोना संशयित महिला परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २० मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेचे  स्वॅब तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या संदर्भातील अहवाल शनिवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये मयत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सावंगी भांबळे हे गाव सील केले असून या गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

 तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सकाळीच गावाला भेट दिली. त्यानंतर महिलेच्या संपर्कातील १३ जणांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, परभणी शहरातील पेडगाव रोड भागातील एका मुलीचा  स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ झाली आहे. त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी