परभणी: जिल्ह्यात आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले असून हे सर्व व्यक्ती महानगरांमधून आलेले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता २० झाली आहे.परभणी शहरातील मातोश्रीनगर, मिलिंद नगर, तालुक्यातील असोला येथील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित आढळला असून सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथीलही एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० झाली असून त्यातील एक जण कोरोनामुक्त झाला आहे. उर्वरित १९ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.