कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:18 AM2021-07-29T04:18:39+5:302021-07-29T04:18:39+5:30

डेंग्यूच्या आजारात ताप येतो, डोके दुखते, सांधेदुखीही जाणवते हीच लक्षणे कोरोना संसर्ग झाल्यासही जाणवतात. त्यामुळे प्रत्येकाने ताप येताच आरटीपीसीआर ...

Corona, similar to the symptoms of dengue; Get tested right away! | कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या !

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या !

Next

डेंग्यूच्या आजारात ताप येतो, डोके दुखते, सांधेदुखीही जाणवते हीच लक्षणे कोरोना संसर्ग झाल्यासही जाणवतात. त्यामुळे प्रत्येकाने ताप येताच आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

चाचणी कुठली?

कोरोनासाठी- आरटीपीसीआर

डेंग्यूसाठी - एलायझा

सर्दी, खोकला व ताप

पावसाळ्यात मलेरिया, हिवतापाची लक्षणे जाणवतात. त्यात सर्दी, ताप येतो.

हीच लक्षणे कोरोनाच्या संसर्गातही जाणवतात. त्यामुळे गाफील राहू नये.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे प्रत्येकाने पालन करावे.

तसेच काही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्यात.

पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा .

दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी शक्यतो उकळून प्यावे.

त्याचप्रमाणे डेंग्यू, मलेरिया हे आजार डासांपासून पसरतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा.

घरासमोरील नाल्या वाहत्या कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.

ताप येणे, डोके दुखणे, सांधेदुखी ही डेंग्यू आणि कोरोनाची सारखीच लक्षणे आहेत. विशेष म्हणजे कोणताही ताप कोरोनामुळे असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी ताप व इतर लक्षणे दिसताच प्राधान्याने कोरोनाची आरटीपीसीआर तपासणी करावी, तसेच डेंग्यूच्या निदानासाठी एलायझा तपासणी करावी.

- डॉ. संजय हरबडे,

वैद्यकीय अधीक्षक, सेलू

Web Title: Corona, similar to the symptoms of dengue; Get tested right away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.